IPL 2023 : रहाणे नव्हे, हा तर CSK चा सेहवाग; तुफानी फलंदाजीमुळं पुन्हा भारतीय संघात स्थान?

Ajinkya Rahane : अखेर अजिंक्यला सूर गवसला... आयपीएल सुरु झाल्यापासून हे सातत्यानं म्हटलं जात आहे. आणि म्हणूही का नये? मैदान गाजवणाऱ्या अजिंक्य रहाणेचा नवा फॉर्म पाहिला का?   

Updated: Apr 25, 2023, 09:21 AM IST
IPL 2023 : रहाणे नव्हे, हा तर CSK चा सेहवाग; तुफानी फलंदाजीमुळं पुन्हा भारतीय संघात स्थान? title=
IPL 2023 ajinkya rahane wins hearts with his batting cricket lovers go went crazy wtc match

Ajinkya Rahane : भारतीय क्रिकेट (Team India) संघात मागील बऱ्याच काळापासून काही नवख्या खेळाडूंना संधी मिळाली. संघातून काही खेळाडूंच्या जागी नवख्या खेळाडूंना संधी देत निवड समितीनं जणू या वरिष्ठांना इशाराच दिला आणि आता याच खेळाडूंनी तो गांभीर्यानं घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अशा खेळाडूंमध्ये येणारं एक नाव म्हणजे अजिंक्य रहाणे. गेल्या काही काळापासून भारतीय क्रिकेट संघापासून दूर असणारा अजिंक्य रहाणे CSK च्या संघातून आयपीएलचं यंदाचं पर्व गाजवताना दिसत आहे. 

रविवारी पार पडलेल्या (Chennai Super Kings) चेन्नई विरुद्ध कोलकात्याच्या (Kolkata Knight Riders) सामन्यामध्ये त्याची तुफानी फलंदाजी पाहून तर, अनेक क्रिकेटप्रेमींनी हा माहीच्या संघातील सेहवाग आहे, असंच म्हटलं. अजिंक्यनं या सामन्यामध्ये 29 चेंडूंमध्ये तब्बल 71 धावा ठोकल्या. दणदणीत चौकार, षटकार ठोकत आणि काही अप्रतिम Shots मारत त्यानं मैदानात आणि घरामध्ये टीव्हीसमोर सामना पाहणाऱ्या क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली. 

रहाणेची बॅट तळपण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यंदाच्या वर्षी बेन स्टोक्सच्या दुखापतीमुळं त्याला पर्याय म्हणून चेन्नईच्या संघात त्याला स्थान मिळालं आणि हा विश्वास त्यानं सार्थ ठरवला. सातत्यानं त्यानं  61, 31, 37, 9 आणि 71 अशा धावा ठोकल्या. यामध्ये एक खेळी वगळता इतर प्रत्येक खेळीमध्ये त्यानं आपली छाप सोडली. थोडक्यात यंदाचं आयपीएल गाजवायचं! असंच काहीसं तो ठरवून आल्याचं पाहायला मिळत आहे. 

आयपीएलमधून रहाणेला किती पैसे मिळतायत? 

आकर्षणाची बाब म्हणजे चेन्नईच्या एकुलत्या एक संघानं त्याच्यावर आयपीएलच्या 2023 साठीच्या लिलावात 50 लाख रुपयांची बोली लावली होती. या रकमेच्या तुलनेत तो दाखवत असणारा खेळ कमाल आहे असंच म्हणावं लागेल. 

रहाणे In सूर्या Out? 

दरम्यान इथे आयपीएलची धूम सुरु असतानाच तिथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप  (WTC) संदर्भातही बऱ्याच बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. 7 जूनपासून London मधील ओवल मैदानाच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा हा सामना पार पडणार आहे. या सामन्याच्या निमित्तानं संघात रहाणेला स्थान मिळू शकतं असा क्रिकेट जाणकारांचा अंदाज आहे. 

हेसुद्धा वाचा : IPL 2023 मधून विराट- रोहित Out ? क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी

 

इंग्लंडमधील मैदानांची त्याला असणारी माहिती आणि त्याचा तेथील अनुभव पाहता भारतीय संघाला त्याची मोठी मदत होईल. शिवाय आयपीएलमध्ये त्याचा फॉर्म पाहता रहाणेला संघात स्थान मिळाल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. हो, पण रहाणे संघात आल्यास त्याच्या अनुभवाला पाहता तुलनेनं सूर्यकुमार यादवचा कसोटी सामन्यांतील कमी अनुभव त्याला संघाबाहेर राहण्यास भाग पाडू शकतो. आता निवड समिती संघात या दोघांपैकी नेमकं कोणाला स्थान देते हे पाहणं औत्सुक्याचं.