Mohammed Siraj: 'सॉरी मला माफ कर...', अखेर 'त्या' कृत्यावर सिराजने खुलेआम मागितली माफी; पाहा Video

VIDEO, RCB vs RR: मी खूप रागीट माणूस आहे. माफ कर, काय नाव महिपाल, कृपया मला माफ कर. मी दोनदा माफी मागितली आहे. तो राग फिल्डपर्यंतच राहतो, त्यानंतर माझा राग शांत होतो, असं सिराज (Mohammed Siraj) यावेळी म्हणाला आहे.

Updated: Apr 24, 2023, 10:24 PM IST
Mohammed Siraj: 'सॉरी मला माफ कर...', अखेर 'त्या' कृत्यावर सिराजने खुलेआम मागितली माफी; पाहा Video title=
Mohammed Siraj,Mahipal Lomror,RCB,Video,RCB vs RR

Mohammed Siraj apologies to Mahipal Lomror: टीम इंडियाचा किंग विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) रविवारी संध्याकाळी आयपीएलच्या (IPL 2023) 32 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (RR) संघाचा 7 धावांनी पराभव केला. या सामन्यातील विजयामुळे आयसीबीची वाटचाल सुरूच असल्याचं पहायला मिळतंय. या सामन्यात धक्कादायक घटना घडली. आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) आपल्या सहकारी खेळाडूला शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर आता सिराजने खुलेआम माफी मागितली आहे.

नेमकं काय झालं?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) सामन्याची 19 वी ओव्हर होती. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर राजस्थानचा फलंदाज ध्रुव जुरेलने स्ट्रेट ड्राईव्ह फटका मारला. त्यावेळी त्याला दोन धावा काढायच्या होत्या. बॉल आरसीबीचा फिल्डर महिपाल लोमरोर (Mahipal Lomror) याच्याकडे गेला. लोमरोरचा थ्रो थोडासा चुकला अन् त्यामुळे सिराजला चेंडू पकडता आला नाही. त्यामुळे सिराजचा पाय स्टंप्सला लागला होता. त्यावेळी त्याने लोमरोरवर आपला राग व्यक्त केला होता. त्याचा व्हिडिओ (Siraj vs Mahipal) सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असल्याचं दिसलं होतं.

आरसीबीने त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) माफी मागताना दिसतोय. सिराज मैदानात खेळताना आपली आक्रमकता नेहमी दाखवतो. त्यामुळे त्याने सॉरी म्हणत माफी मागितली आहे.

काय म्हणाला Mohammed Siraj?

मी खूप रागीट माणूस आहे. माफ कर, काय नाव महिपाल, कृपया मला माफ कर. मी दोनदा माफी मागितली आहे. तो राग फिल्डपर्यंतच राहतो, त्यानंतर माझा राग शांत होतो, असं सिराज (Mohammed Siraj) यावेळी म्हणाला आहे.

पाहा Video 

दरम्यान, सिराजने माफी मागितली असली तरी सिराजवर अधिक जास्त प्रमाणात टीका होताना दिसत आहे. व्हि़डिओमध्ये सिराज 'काय नाव त्याचं महिपाल', असं उच्चारताना दिसत आहे. आपल्याच संघातील खेळाडूचं नाव सिराजला माहिती कसं नाही? असा सवाल आता नेटकरी विचारताना दिसत आहेत. त्यामुळे आता सिराज सोशल मीडियावर ट्रोल देखील होतोय.