लॉर्ड्सवर शतक ठोकलेल्या टीम इंडियाच्या माजी मराठमोळ्या खेळाडूकडे मोठी जबाबदारी

आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर 29 मे अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.   

Updated: Feb 25, 2022, 07:48 PM IST
लॉर्ड्सवर शतक ठोकलेल्या टीम इंडियाच्या माजी मराठमोळ्या खेळाडूकडे मोठी जबाबदारी title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर 29 मे अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या मोसमात एकूण 74 सामने खेळवण्यात येणार आहेत. या पैकी 70 सामने हे साखळी फेरीतील असणार आहेत. तर 4 सामने हे प्लेऑफचे असतील. या 15 व्या हंगामासाठी सर्व 10 संघांनी कंबर कसली आहे. दरम्यान दिल्ली कॅपिट्ल्स टीमने टीम इंडियाच्या माजी मराठी क्रिकेटरला मोठी जबाबदारी दिली आहे.(ipl 2022 team india former fast bowler ajit agarkar has joined delhi capitals coaching staff as assistant coach)

टीम इंडियाकडून खेळलेल्या या क्रिकेटरने क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर शतक ठोकण्याची कामगिरी केली होती. तसेच या खेळाडूने आयपीएलमध्ये दिल्लीचं प्रतिनिधित्वही केलं होतं.

दिल्ली कॅपिट्ल्सने मॅनेजमेंटने या क्रिकेटरकडे मोठी जबाबदारी दिली आहे. दिल्लीने या खेळाडूचा कोचिंग स्टाफमध्ये समावेश केला आहे. अजित आगरकर आता दिल्ली टीमच्या  सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणार आहे. दिल्ली फ्रँचायजीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

आगरकरची आयपीएल कारकिर्द

अजित आगरकरने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिट्ल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याने एकूण 42 सामन्यात  29 विकेट्स घेतल्या आहेत. 

तसेच आगरकरने 191 वनडे, 26 टेस्ट आणि 4 टी 20 सामन्यात  टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे आगरकरने क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानात शतक लगावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती.