IPL 2022 : आयपीएलमधून भारताला नवे कर्णधार मिळतील, असे रवी शास्त्री म्हणाले होते. तर सुनील गावस्कर म्हणाले होते की, जडेजा चेन्नईचा नवा कर्णधार होऊ शकतो. त्यानंतर आज चेन्नई सुपर किंग्जने अधिकृतपणे जडेजाला संघाचा कर्णधार बनवण्याची घोषणा केली आहे.
चेन्नई सुपर किंग्सने IPL 2022 सुरू होण्याच्या दोन दिवस आधी जडेजाला ( Ravindra Jadeja) संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई संघाने पहिल्यांदाच कर्णधार बदलला आहे. धोनी 2008 पासून संघाचा कर्णधार होता आणि तो त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलचा प्रत्येक सामना खेळला.
धोनी दुसऱ्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली प्रथमच आयपीएल सामना खेळणार आहे. जडेजा कर्णधार होताच या दोन भारतीय दिग्गजांचे अंदाज खरे ठरले आहेत. आयपीएलमधून भारताला नवा कर्णधार मिळेल, असे शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले होते. तर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) म्हणाले होते की, जडेजा चेन्नईचा नवा कर्णधार असेल.
चेन्नईचा कर्णधार म्हणून जडेजाची कामगिरी चांगली राहिली तर तो टीम इंडियाचा कर्णधार होण्याचा दावेदारही ठरू शकतो. मात्र, भारतीय क्रिकेट बोर्ड 33 वर्षीय जडेजाकडे कर्णधारपद देण्याच्या बाजूने नाही. रोहितनंतर ऋषभ पंत किंवा लोकेश राहुलसारख्या युवा खेळाडूंना भारतीय संघाचा कर्णधार बनवलं जाईल.
जडेजाला चेन्नईचा नवा कर्णधार बनवण्यापूर्वी सुनील गावस्कर म्हणाले होते की, धोनीची जागा घेण्यास तो तयार आहेत. जर धोनीला आयपीएल 2022 मध्ये एक किंवा दोन सामन्यांसाठी विश्रांती घ्यायची असेल तर जडेजा संघाची जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो. काही तासांनंतर चेन्नई सुपर किंग्जने जडेजाला संघाचा नवा कर्णधार बनवले.
आयपीएलमधून भारताला नवे कर्णधार मिळतील, असे रवी शास्त्री म्हणाले होते. "विराट आता कर्णधार नाही, पण रोहितची कामगिरी उत्कृष्ट आहे. विशेषत: एकदिवसीय आणि टी-20 मध्ये. आता भविष्यातील कर्णधार कोण असेल ते भारताला दिसेल. यात श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि केएल राहुल स्पर्धेत आहेत. भारतीय संघ मजबूत कर्णधाराच्या शोधात असेल आणि या सर्व खेळाडूंना या आयपीएलमध्ये संधी मिळेल."
गावस्कर म्हणाले होते, "जडेजा एक खेळाडू म्हणून ज्या प्रकारे परिपक्व झाला आहे. ज्या प्रकारे परिस्थितीनुसार आपला खेळ बदलतो आणि सामना समजून घेतो, ते विलक्षण आहे. मला आश्चर्य वाटणार नाही. धोनीने कोणत्याही सामन्यात विश्रांती घेण्याचे ठरवले आणि जडेजाला संघाचा कर्णधार बनवले तर.