मुंबई : महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) आयपीएलच्या 15 व्या मोसमाआधी (IPL 2022) चेन्नईची कॅप्टन्सी सोडली. आता धोनी एक खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये खेळणार आहे. धोनी त्यांच्या सायलेंट गेमसाठी ओळखला जातो. परिस्थिती कितीही कठीण असो, त्यातून मार्ग कसा काढायचा, प्रतिकूल स्थितीवर मात कशी करायची, हे धोनीने टीम इंडियाला शिकवलं. धोनीच्या या स्वभावामुळेच त्याला 'कॅप्टन कूल' म्हटलं जायचं. मात्र नेहमीच मैदानात शांत असलेल्या धोनीचा रौद्र रुपही पाहायला मिळाला. धोनीला एकूण 3 वेळा स्वत:च्या रागावर ताबा ठेवता आला नाही. ते 3 प्रकरणं नक्की काय आहेत, हे आपण जाणून घेऊयात. (ipl 2022 csk chennai super kings captain ms dhoni biggest 3 controversy in his career)
पहिला वाद
आयपीएल 2019 मध्ये धोनी राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात डगआऊटमधून मैदानावर आला. धोनीने थेट अपांयरसोबत हुज्जत घातली. चेन्नईला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 18 रन्सची गरज होती. स्टोक्सने पहिल्या तीन बॉलमध्ये 10 रन्स केल्या. चौथ्या बॉलवर सर्व राडा झाला.
स्टोक्सने टाकलेला चौथा बॉल फुल टॉस टाकला होता. त्यावर मिचेल सँटनरने दोन रन्स घेतल्या. यानंतर रवींद्र जाडेजा आणि सँटनरने अंपायरकडे नो बॉलची मागणी केली, पण तसं काय झालं नाही. जडेजा अंपायरशी वाद घालत राहिला. त्यानंतर रागाच्या भरात धोनी डगआऊटमधून मैदानात आला. धोनीने पंचांशी वाद घातला पण त्यांनी निर्णय कायम ठेवला.
धोनीचा दुसरा वाद
आयपीएलच्या 13 व्या मोसमात धोनीने तर कहरच केला. धोनीकडून ज्याची कोणी कधी अपेक्षा केली नव्हती, तसं झालं. या 13 व्या मोसमात चेन्नईला 7 व्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे धोनीने टीममधील युवा खेळाडूं विरुद्ध वक्तव्य केलं. "पहिल्या 10 सामन्यात मी युवा खेळाडूंना संधी दिली नाही, कारण मला त्यांच्यात असलेली खेळाप्रती जिद्द नव्हती", असं धोनी म्हणाला.
धोनीचा तिसरा वाद
तिसरा वाद आहे आयपीएलच्या 14 व्या हंगामातील. चेन्नई विरुद्ध हैदराबाद यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यादरम्यान शार्दुल ठाकूरने बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला.
अंपायर पॉल रायफल हा वाईड बॉलचा निर्णय देण्याच्या तयारीत होते. मात्र तेवढ्यात स्टंप्समागून धोनीने आरडाओरडा केला. त्यामुळे अंपायरने वाईड बॉलचा इशारा देण्यासाठी उघडलेले हात पुन्हा बंद केले. अंपायरने हा वाईड बॉल दिला नाही.