IPL 2022, RCB vs MI | अभिषेक शर्माची शानदार खेळी, हैदराबादचा चेन्नईवर 8 विकेट्सने दणदणीत विजय

चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) सलग चौथा पराभव झाला आहे.  

Updated: Apr 9, 2022, 07:30 PM IST
IPL 2022, RCB vs MI | अभिषेक शर्माची शानदार खेळी, हैदराबादचा चेन्नईवर 8 विकेट्सने दणदणीत विजय title=
छाया सौजन्य : आयपीएल

मुंबई :  चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) सलग चौथा पराभव झाला आहे. सनरायजर्स हैदराबादने (SRH) सीएसकेवर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. चेन्नईने हैदराबादला विजयासाठी 155 धावांचे आव्हान दिले होते. हैदराबादने  हे विजयी आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात 17.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. ( ipl 2022 csk vs srh sunrisers hyderabad win by 8 wickets against chennai super kings by 8 wickets)

अभिषेक शर्मा हैदराबादच्या विजयाचा हिरो ठरला. अभिषेकने 50 बॉलमध्ये 5 फोर आणि 3 सिक्ससह 75 धावांची जबरदस्त खेळी केली. कर्णधार केन विलियमसनने 32 धावा केल्या. तर राहुल त्रिपाठीने नाबाद 39 रन्सचं योगदान दिलं. हैदराबादकडून मुकेश चौधरी आणि ड्वेन ब्राव्होने प्रत्येकी 1 विकेट घेतला.   

 

सीएसके प्लेइंग इलेव्हन :  रवींद्र जडेजा (कॅप्टन),  रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दूबे, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), ड्वेन ब्रावो, ख्रिस जॉर्डन, महेश थीक्षाना आणि मुकेश चौधरी.  

एसआरएच प्लेइंग इलेव्हन  :  केन विलियमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा,  राहुल त्रिपाठी, एडेन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंह, वॉशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जेनसेन, उमरान मलिक आणि टी नटराजन.