IPL 2022 | CSK चा स्टार बॅट्समन ऋतुराजकडून चाहत्यांची निराशा

चेन्नईचा स्टार बॅट्समन (Rututaj Gaikwad) ऋतुराज गायकवाड. ऋुतुराजने 14 व्या मोसमात ऑरेन्ज कॅप पटकावली होती. मात्र त्याला या मोसमात अद्याप सूर गवसलेला नाही.  

Updated: Apr 9, 2022, 06:52 PM IST
 IPL 2022 | CSK चा स्टार बॅट्समन ऋतुराजकडून चाहत्यांची निराशा title=

मुंबई : चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings), आयपीएलच्या (IPL) इतिहासातील सर्वात दुसरी यशस्वी टीम. मात्र चेन्नईला आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) अपेक्षित सुरुवात करता आलेली नाही. चेन्नईला आपल्या पहिल्या 3 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामागे त्यांच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरीही कारणीभूत ठरतेय. चेन्नईचा स्टार बॅट्समन (Rututaj Gaikwad) ऋतुराज गायकवाड. ऋुतुराजने 14 व्या मोसमात ऑरेन्ज कॅप पटकावली होती. मात्र त्याला या मोसमात अद्याप सूर गवसलेला नाही. चेन्नईचा या मोसमातील चौथा सामना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध खेळवण्यात येत आहे. ऋतुराजने या सामन्यातही चाहत्यांची निराशा केली. (ipl 2022 csk vs srh chennai super kings opener ruturaj gaikwad batsman scored 18 runs in 4 match)

ऋतुराजला यॉर्कर किंग टी नटराजनने 16 धावांवर क्लिन बोल्ड केलं. ऋतुराजला या सामन्यात अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र त्याला या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. ऋतुराजच्या या मोसमातील सातत्यपूर्ण निराशाजनक खेळीमुळे त्याच्यावर टीका केली जात आहे. ऋतुराजने या 15 व्या मोसामातील आतापर्यंत एकूण 4 सामन्यात 20 धावाही करता आलेल्या नाहीत. 

ऋतुराज या 14 व्या मोसमातील पहिल्या सामन्यात भोपळा न फोडता माघारी झाला. ऋतुराजने त्यानंतरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात अनुक्रमे प्रत्येकी 1 धाव केली. त्यानंतर आज हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने 3 चौकार ठोकले. तो चांगला खेळत होता. मात्र नटराजनने बोल्ड करत ऋतुराजला 16 धावांवर असताना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.  

ऋतुराजने 14 व्या मोसमात संथ सुरुवात केली होती. ऋतुराजने मात्र त्यानंतर टॉप गिअर टाकत जोरदार फटकेबाजी केली आणि ऑरेन्ज कॅप पटकावली. एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेन्ज कॅप दिली जाते. ऋतुराजने 14 व्या मोसमात 635 धावा केल्या होत्या.

यूएईत हिट भारतात फ्लॉप

ऋतुराजच्या आयपीएल कारकिर्दीबाबत धक्कायदायक आकडेवारी समोर आली आहे. ऋतुराजने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 26 डावात बॅटिंग केली आहे. यापैकी तो 11 वेळा भारतात आणि 15 वेळा यूएईमध्ये खेळला आहे.

ऋतुराजने भारतात खेळलेल्या 11 डावांमध्ये 2 अर्धशतकांसह 121 च्या स्ट्राईक रेटने 214 धावा केल्या आहेत. तर यूएईत खेळलेल्या 15 इनिंग्समध्ये 133 च्या स्ट्राईक रेट आणि 58 च्या एव्हरेजने 643 धावा केल्या. यामध्ये 5 अर्धशतक आणि  1 शतकाचा समावेश आहे.  या आकडेवारीवरुन स्पष्ट होतं की, ऋतुराजला भारतात धावा करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतोय.