विराटच्या रेकॉर्डवर धवनचा डोळा, चेन्नई विरुद्धच्या सामन्यात कोहलीला पछाडणार?

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 11 व्या सामना (Ipl 2022 Match 11) आज (3 एप्रिल) पार पडणार आहे.  या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) आमनेसामने असणार आहेत.

Updated: Apr 3, 2022, 03:47 PM IST
विराटच्या रेकॉर्डवर धवनचा डोळा, चेन्नई विरुद्धच्या सामन्यात कोहलीला पछाडणार? title=

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 11 व्या सामना (Ipl 2022 Match 11) आज (3 एप्रिल) पार पडणार आहे.  या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील तिसरा सामना आहे. पंजाबने 2 पैकी 1 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एकदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. तर चेन्नईच्या पदरी पहिल्या दोन्ही मॅचमध्ये निराशाच पडली. त्यामुळे चेन्नई पहिल्या विजयाच्या प्रयत्नात असणार आहे. या सामन्यात पंजाबचा ओपनर 'गब्बर' शिखर धवनला (Shikhar Dhawan) मोठा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. (ipl 2022 csk vs pbks shikhar dhawan has chance to break virat kohli most runs record against chennai super kings)

रेकॉर्ड काय आहे?

विराट कोहलीने (Virat Kohli) आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटने चेन्नई विरुद्ध 948 धावा केल्या आहेत. तर शिखरने चेन्नई विरुद्ध 908 धावा कुटल्या आहेत. त्यामुळे शिखरला विराटचा हा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी 41 धावांची गरज आहे. 

खास रेकॉर्ड करण्याची संधी

धवनने 7 चौकार लगावले तर त्याचा मानाच्या पंक्तीत समावेश होईल. धवनने 7 चौकार लगावताच तो 1 हजार चौकार लगावणारा पहिला भारतीय ठरेल. शिखरने आतापर्यंत  305 टी 20 सामन्यात 993 चौकार ठोकले आहेत. आतापर्यंत टी 20 मध्ये फक्त 3 फलंदाजांनाच ही कामगिरी करता आलेली आहे.

यामध्ये ख्रिस गेल, एलेक्स हेल्स आणि डेव्हिड वॉर्नरचा समावेश आहे. त्यामुळे धवन चेन्नई विरुद्धच्या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.