शाहरुख खानच्या मुलीचा KKR च्या मॅचमध्ये हॉट अवतार

चर्चा तर होणारच! अनन्या आर्यनपेक्षाही जास्त भाव खाऊन गेली किंग खानची 'हॉट गर्ल'

Updated: Apr 3, 2022, 03:26 PM IST
शाहरुख खानच्या मुलीचा KKR च्या मॅचमध्ये हॉट अवतार title=

मुंबई : आयपीएलमधील आठवा सामना कोलकाता विरुद्ध पंजाब झाला. हा सामना पाहण्यासाठी शाहरुख खानचा मुलगा आर्यन, मुलगी सुहाना आणि अनन्या पांडे स्टेडियममध्ये आले होते. टीमचं मनोबल वाढवण्यासाठी सुहाना खान आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत पोहोचली होती. 

आर्यन खान आणि अनन्या पांडेला अनेकांनी ट्रोल केलं मात्र या संपूर्ण सामन्यात चाहत्यांचं लक्ष हे शाहरुख खानच्या मुलीकडे म्हणजे सुहानाकडे होतं. आंद्रे रसेड आणि उमेश यादवने कमालीची कामगिरी केली. रसेलने 31 बॉलमध्ये 70 धावा केल्या. 

रसेल जसा सिक्स मारत होता तसं सुहाना, आर्यन आणि अनन्या आपला आनंद सेलिब्रेट करत असल्याचं स्टेडियममध्ये पाहायला मिळालं. सुहानाने पिवळ्या रंगाचा टॉप घातला होता. तिचा बोल्ड अवतार चाहत्यांना घायाळ करणारा होता. 

सुहानाला तिच्या टॉपवरून ट्रोल करण्यात आलं. ती चेन्नईला सपोर्ट करते का असंही काहींनी तिच्या कपड्यावरून विचारलं. मात्र तिच्या फोटो आणि व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा रंगली. जेवढा भाव आर्यन आणि अनन्या खाऊन गेली नाही तेवढं एकट्या सुहानानं सोशल मीडियावर फुटेज खाल्लं आहे. 

याआधी आर्यन खान आणि सुहाना मेगाऑक्शन दरम्यान दिसले होते. शाहरुख खान सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने तो येऊ शकला नाही. त्यामुळे टीमचं मनोबल वाढवण्यासाठी आर्यन आणि सुहाना स्टेडियममध्ये दिसत आहेत. 

कोलकाता टीम यंदा चांगली कामगिरी करत आहे. कोलकाता संघाने सलग दुसरा विजय मिळवला आहे. पंजाब संघाला पराभूत करण्यात त्यांना यश मिळालं. पॉईंट टेबलवरही कोलकाता टीम दुसऱ्या स्थानावर आहे. यंदा ट्रॉफीसाठी कोलकाता टीम दावेदार मानला जात आहे.