IPL 2022, Rohit Sharma | कॅप्टन रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात पराभव झाल्याने संतापला

 पहिल्याच सामन्यात पराभव झाल्याने मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) संतापला आहे.  

Updated: Mar 28, 2022, 05:27 PM IST
IPL 2022, Rohit Sharma | कॅप्टन रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात पराभव झाल्याने संतापला title=

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) दुसरा सामना (2nd Match) हा दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध (Delhi Capitals) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्लीने मुंबईला पराभूत करत विजयी सुरुवात केली. मुंबईने विजयााठी दिलेले 178 धावांचं आव्हान दिल्लीने 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. पहिल्याच सामन्यात पराभव झाल्याने मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) संतापला आहे.

रोहित काय म्हणाला? 

"मी विचार केला होता की 177 धावा या सन्मानजनक आहेत. ही त्या प्रकारची पीच वाटत नव्हती, जिथे तुम्ही सुरुवातीपासून 170 पेक्षा अधिक धावा करु शकता. मात्र आम्ही चांगलं खेळलो आणि उत्तमरित्या शेवट केला. आम्ही केलेली धावसंख्या ही चांगली होती. फरक इतकाच होता की आम्ही ठरवल्यानुसार बॉलिंग केली नाही", अशी खंत रोहितने व्यक्त केली.   

"आम्ही नेहमीच सज्ज होऊनच मैदानात उतरतो, मग तो पहिला सामना असो किंवा शेवटचा. आमचा प्रत्येक सामना जिंकण्याचा उद्देश असतो. मात्र आमच्याकडून काही चुका झाल्या", अशी प्रांजल कबुली रोहितने दिली. 

"आम्ही चुका दुरुस्त करु शकतो.  फक्त आम्हाला काय चुकलं हे लक्षात ठेवण्याची गरज आहे", असं रोहितने नमूद केलं.