IPL 2021 Point Table : मानाच्या 2 कॅपवर भारतीय खेळाडूंचा वरचष्मा

ऑरेंज आणि पर्पल कॅपमध्ये दोन्हीकडे भारतीय खेळाडू, पॉइंट टेबलमध्ये कोण पहिल्या स्थानावर?

Updated: Apr 28, 2021, 06:01 PM IST
IPL 2021 Point Table : मानाच्या 2 कॅपवर भारतीय खेळाडूंचा वरचष्मा title=

मुंबई: एक रनने दिल्लीमध्ये ऋषभ पंतच्या संघाला पराभूत करून विराट कोहलीच्या संघाने पराभूत करत पॉइंट टेबलमध्ये पहिलं स्थान गाठलं आहे. पॉइंट टेबलवरच्या पहिल्या नंबरच्या चेन्नई सुपरकिंग्स आणि बंगळुरू संघात टफ फाईट सुरू आहे. कोहलीच्या संघाने चेन्नई सुपरकिंग्स वगळता आतापर्यंत खेळलेल्या सगळ्या सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. 

पर्पल कॅपमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील हर्षल पटेल पहिल्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर दिल्लीचा आवेश खान आहे. त्याने आतापर्यंतच्या सामन्यामध्ये 12 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यानंतर राहुल चहर आहे मुंबई संघाचा. त्याने देखील 9 विकेट्स काढल्या आहेत.  पर्पल कॅपवर भारतीय खेळाडू हर्षल पटेलचं नाव आहे. त्याने सर्वात जास्त विकेट्स घेतल्या आहेत. 

ऑरेंज कॅपवर दिल्ली कॅपिटल्स संघातील शिखर धवननं आपलं नाव कोरलं आहे. 265 धावांसह तो पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर के एल राहुल आहे. तर तिसऱ्या स्थानावर बंगळुरू संघाचा ग्लॅन मॅक्सवेल आहे. के एल राहुल आणि शिखर धवनमध्ये ऑरेंज कॅपसाठी चुरस पाहायला मिळू शकते. 

पॉइंट टेबलमध्ये 6  सामने खेळून बंगळुरू संघ सध्या टॉपवर आहे. दुसऱ्या स्थानावर 5 सामने खेळून चेन्नई संघ आहे. तिसऱ्या स्थानावर दिल्ली तर चौथ्या स्थानावर मुंबई संघ आहे. या चार संघांमध्ये यंदाच्या आयपीएलमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे.