IPL 2021: कोलकाता विरुद्ध जिंकण्यासाठी दिल्लीची नवी रणनिती, Playing XI मध्ये मोठा बदल

Qualifier 2: कोलकाता संघाचा टॉस जिंकला, दिल्लीला करावी लागणार फलंदाजी, दिल्लीची रणनिती यशस्वी ठरेल?

Updated: Oct 13, 2021, 07:37 PM IST
IPL 2021: कोलकाता विरुद्ध जिंकण्यासाठी दिल्लीची नवी रणनिती, Playing XI मध्ये मोठा बदल  title=

मुंबई: आयपीएलमधील सर्वात महत्त्वपूर्ण सामना आज होत आहे. Qualifier 2 सामन्यात दिल्ली विरुद्ध कोलकाता शारजाह स्टेडियममध्ये सामना होत आहे. या सामन्यात कोलकाता संघाने टॉस जिंकला असून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. तर दिल्ली संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरणार आहे. या संघापैकी जो जिंकेल त्याला महाअंतिम सामन्यासाठी चेन्नईसोबत खेळण्याची संधी मिळणार आहे. 

दिल्ली संघाने कोलकाता विरुद्ध जिंकण्यासाठी नवी रणनिती आखली आहे. दिल्ली संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मार्कस स्टोइनिसला संधी दिली आहे. हा ऑलराऊंड़र खेळाडू गेम चेंजर ठरणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन बॅटिंगसाठी क्रिझवर उतरले आहेत. दिल्ली संघाने सुरुवात जरी धीमी केली असली तरी सावध खेळी करत हा सामना जिंकण्याचे पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचं दिसत आहे. 

कोलकाता संघाचे बॉलर्स दिल्लीच्या झंझावाती फलंदाजांना कसं रोखणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. कोलकाता संघासाठी आजचा सामना करो या मरोची लढाई आहे. चाहत्ये कोलकाता संघ जिंकावा म्हणून प्रार्थना करत आहेत. 

दिल्ली कॅपिटल्स संघ Playing XI

शिखर धवन, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, अक्षर पटेल, आर अश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान आणि एनरिक नॉर्खिया.

कोलकाता संघ Playing XI

शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इयॉन मॉर्गन, शाकिब अल हसन, दिनेश कार्तिक, सुनील नरेन, शिवम मावी, लोकी फर्गुसन आणि वरुण चक्रवर्ती.