दुबई: इशान किशनच्या झंझावाती फलंदाजीनंतरही मुंबईला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आलं. मुंबई संघ प्ले ऑफमधून बाहेर झाला. तर कोलकाता संघाने राजस्थान संघावर 86 धावांनी विजय मिळवून प्ले ऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. IPL 2021च्या 14 व्या हंगामात चेन्नई, बंगळुरू, दिल्ली आणि कोलकाता असे चार संघ पोहोचले आहेत. आता यांचं संपूर्ण शेड्युल कसं असणार आहे ते जाणून घेऊया.
IPL 2021 प्ले ऑफ शेड्युल
क्वालिफायर- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स
हा सामना 10 ऑक्टोबर म्हणजेच रविवारी संध्याकाळी दुबईमध्ये 7.30 वाजता होणार आहे. UAE मध्ये हा सामना होणार आहे. कोरोनामुळे दुसऱ्या टप्प्यातील आयपीएलचे सामने UAE मध्ये खेळवले जात आहेत. दिल्ली संघ 14 सामने खेळून 10 सामने जिंकले आहेत. त्याचे 20 पॉइंट्स झाले आहेत. तर दुसऱ्या स्थानावर चेन्नई आहे. चेन्नई संघाला 18 पॉइंट्स मिळाले आहेत.
एलिमिनेटर- राजस्थान रॉयल्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
RCB विरुद्ध CSK सामना 11 ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी होणार आहे. हा सामना शारजाह इथे होणार आहे. बंगळुरू संघ 14 सामने खेळून 18 पॉइंट मिळवत तिसऱ्या स्थानावर आहे. तर कोलकाता संघ चौथ्या स्थानावर आहे.
Qualifier 2- पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झालेला संघ विरुद्ध एलिमिनेटरपैकी जिंकलेला संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. त्यांच्यातून जिंकलेला अंतिम सामन्यासाठी पोहोचेल. हा सामना 13 ऑक्टोबर रोजी शारजाह इथे संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे.
फायनल सामना- पहिल्या Qualifier मधील विजेता आणि दुसऱ्या Qualifier मधील विजेता या दोघांमध्ये हा सामना होणार आहे. यातून जो विजयी होईल त्याला चॅम्पियन्सची ट्रॉफी मिळेल. हा सामना 15 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजता दुबई इथे होणार आहे.