मुंबई : टी-20 विश्वचषक 2021 (T-20 World cup)सुरू होण्यास फक्त 8 दिवस शिल्लक आहेत. टीम इंडियाला ही मोठी स्पर्धा जिंकण्याची उत्तम संधी आहे. भारताकडे विश्वचषकासाठी संघात प्रत्येक स्थानासाठी अनेक खेळाडू आहेत आणि ते सर्व चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. असे मानले जातेय की केएल राहुल (KL Rahul) विश्वचषकात रोहित शर्मासह (Rohit Sharma) सलामी बॅट्समन म्हणून जाऊ शकतो. परंतु कर्णधार विराट कोहलीची योजना वेगळी आहे.
कोहलीने या खेळाडूवर जबाबदारी सोपवली
खरं तर, विश्वचषक संघासाठी निवड होत असताना, विराट कोहलीने (Virat Kohli) युवा फलंदाज इशान किशनला सांगितले होते की त्याला रोहित शर्मासह सलामीची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज इशान किशनने म्हटले आहे की, जेव्हा जेव्हा त्याला विचारले जाईल तेव्हा तो डाव सुरु करण्यास तयार आहे. ईशान म्हणाला की, त्याला भारतीय कर्णधार विराट कोहलीकडून मिळालेली प्रेरणा क्रमवारीच्या शीर्षस्थानी फलंदाजी करणे सोपे करत आहे.
ओपनिंगच्या भूमिकेबद्दल ईशान म्हणाला, 'मी एका वेळी फक्त एका मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत होतो. मला ओपनिंग आवडते आणि तेच कोहली भाई म्हणाले. 'तुझी सलामीवीर म्हणून निवड झाली आहे आणि त्यासाठी तुला तयार राहावे लागेल.' यातून एक गोष्ट जवळपास स्पष्ट झाली आहे की राहुल मधल्या फळीत खेळू शकतो. रोहितसह ईशानने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातही ओपनिंग केली आहे आणि त्याची बॅट सध्या चांगल्या फॉर्मात आहे.
हैदराबाद विरुद्ध फलंदाजी (SRH vs MI)
इशानने शुक्रवारी आयपीएल 2021 च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 32 चेंडूत 84 धावा केल्या आणि संघाला 235 धावांच्या मजबूत स्कोअरपर्यंत नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. पण हैदराबादविरुद्धचा विजयही मुंबईला प्लेऑफमध्ये नेऊ शकला नाही आणि नेट रन रेटच्या आधारे मुंबईचा प्रवास थांबला. तो म्हणाला की, 'धावा करणे माझ्यासाठी आणि संघासाठी चांगले आहे. विश्वचषकापूर्वी मला चांगली कामगिरी करायची होती. मी सकारात्मक होतो आणि आमचे लक्ष्य 250-260 धावा करण्याचे होते.
इशान किशनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात अतिशय नेत्रदीपक पद्धतीने केली. त्याने टी-20 मध्ये इंग्लंडविरुद्ध अर्धशतक ठोकले. एवढेच नाही, अलीकडेच श्रीलंकेविरुद्ध, इशानने त्याच्या एकदिवसीय पदार्पणात अर्धशतकही केले. या युवा फलंदाजामध्ये विरुद्ध संघाकडून सामना हिसकावण्याची ताकद आहे.