मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाचं वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं आहे. २९ मार्चपासून २०२० सालच्या मोसमाला सुरुवात होणार आहे. आयपीएलचा पहिलाच सामना गतविजेती मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगेल. तसंच लीगची शेवटची मॅच मुंबई आणि बंगळुरू यांच्यात १७ मे रोजी होईल. तर २४ मेरोजी आयपीएलची फायनल खेळवली जाईल.
यावेळच्या मोसमात काही बदल करण्यात आले आहेत. यावेळी शनिवारी २ मॅच खेळवण्यात येणार नाहीत, पण रविवारी मात्र नेहमीप्रमाणे दोन मॅच खेळवल्या जातील. त्यामुळे आयपीएलचा कालावधी ६ दिवसांनी वाढला आहे. यावेळी आयपीएल ५० दिवसांची असणार आहे. याआधी ४४ दिवसांमध्ये स्पर्धा संपायची.
दुपारच्या वेळी ४ वाजता आयपीएलचे सामने खेळवायला टीम उत्सुक नव्हत्या. दुपारच्या सामन्यांसाठी स्टेडियममध्ये प्रेक्षक कमी संख्येने येत असल्यामुळे टीमनी दुपारी मॅच खेळवल्या जाऊ नयेत अशी मागणी केल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. अखेर आयपीएलने यंदाच्या मोसमातल्या शनिवार दुपारच्या मॅच रद्द केल्या. रविवार दुपारच्या मॅचही रद्द केल्या असत्या तर आयपीएलचं वेळापत्रक आणखी लांबलं असतं, त्यामुळे रविवारी दोन सामने कायम ठेवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मुंबईच्या टीमला त्यांची ट्रॉफी वाचवण्याचं आव्हान असणार आहे. सर्वाधिक वेळा आयपीएल जिंकण्याचा विक्रम मुंबईच्या टीमच्या नावावर आहे. मुंबईने २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ साली आयपीएल स्पर्धा जिंकली होती.
२९ मार्च- मुंबई विरुद्ध चेन्नई- रात्री ८.०० वाजता- मुंबई
१ एप्रिल- हैदराबाद विरुद्ध मुंबई- रात्री ८.०० वाजता- हैदराबाद
५ एप्रिल- मुंबई विरुद्ध बंगळुरू- दुपारी ४.०० वाजता- मुंबई
८ एप्रिल- पंजाब विरुद्ध मुंबई- रात्री ८.०० वाजता- मोहाली
१२ एप्रिल- कोलकाता विरुद्ध मुंबई- रात्री ८.०० वाजता- कोलकाता
१५ एप्रिल- मुंबई विरुद्ध राजस्थान- रात्री ८.०० वाजता- मुंबई
२० एप्रिल- मुंबई विरुद्ध पंजाब- रात्री ८.०० वाजता- मुंबई
२४ एप्रिल- चेन्नई विरुद्ध मुंबई- रात्री ८.०० वाजता- चेन्नई
२८ एप्रिल- मुंबई विरुद्ध कोलकाता- रात्री ८.०० वाजता- मुंबई
१ मे- मुंबई विरुद्ध दिल्ली- रात्री ८.०० वाजता- मुंबई
६ मे- दिल्ली विरुद्ध मुंबई- रात्री ८.०० वाजता- दिल्ली
९ मे- मुंबई विरुद्ध हैदराबाद- रात्री ८.०० वाजता- मुंबई
११ मे- राजस्थान विरुद्ध मुंबई- रात्री ८.०० वाजता- जयपूर
१७ मे- बंगळुरू विरुद्ध मुंबई- रात्री ८.०० वाजता- बंगळुरू
रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, क्विंटन डिकॉक, मिचल मॅकलॅनघन, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा, कृणाल पांड्या, सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंग, राहुल चहर, इशान किशन, अनुकूल रॉय, आदित्य तरे, जयंत यादव, ट्रेन्ट बोल्ट, धवल कुलकर्णी, शरफेन रदरफोर्ड, क्रिस लीन, नॅथन कुल्टर नाईल, सौरभ तिवारी, मोहसीन खान, दिग्विजय देशमुख, प्रिन्स बलवंत राय