लॉर्ड्सवर पावसाचा खेळ, भारत रणनिती बदलणार?

भारत आणि इंग्लंडमधली दुसरी टेस्ट सुरु व्हायच्या आधी पावसाला सुरुवात झाली आहे. 

Updated: Aug 9, 2018, 04:26 PM IST
लॉर्ड्सवर पावसाचा खेळ, भारत रणनिती बदलणार? title=

लंडन : भारत आणि इंग्लंडमधली दुसरी टेस्ट सुरु व्हायच्या आधी पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे टॉसला उशीर झाला आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर ही मॅच होत आहे. पण पावसामुळे भारतीय टीम त्यांच्या रणनितीमध्ये बदल करु शकते. या मॅचमध्ये भारत २ स्पिनरना घेऊन मैदानात उतरेल, असं बोललं जात होतं. पण पावसामुळे विराट कोहली दोन स्पिनरऐवजी एकच स्पिनर, तीन फास्ट बॉलर घेऊन खेळेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसामुळे फास्ट बॉलरला बॉलिंग टाकताना मदत होते. तसंच ढगाळ वातावरणामुळे बॉल स्विंगही होतो, अशा परिस्थितीमध्ये विराटच्या निर्णयावर लक्ष लागलं आहे.

विराटचे दोन स्पिनरचे संकेत

मॅचच्या आधीच्या दिवशी विराट कोहलीनं २ स्पिनर घेऊन खेळायचे संकेत दिले होते. पण तेव्हापर्यंत लंडनमध्ये कडक उन हडलं होतं. या मॅचसाठीची खेळपट्टी सुकलेली दिसत आहे. त्यामुळे आम्ही दोन स्पिनरना घेऊन मैदानात उतरू शकतो, असे संकेत विराटनं दिले होते.

धवनऐवजी पुजाराला संधी?

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. विराट कोहली वगळता या मॅचमध्ये एकाही खेळाडूला चमकदार कामगिरी करता आली नाही. भारताचा ओपनर शिखर धवनवर या मॅचनंतर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये धवनऐवजी चेतेश्वर पुजाराला संधी दिली जाऊ शकते. पुजाराला संधी दिली तर मुरली विजय आणि लोकेश राहुल ओपनिंगला आणि पुजारा तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला येईल.