Rinku Singh Gods Plan Tattoo: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा T-20 सामन्यांची मालिका 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा ग्वाल्हेरमध्ये रंगणार आहे. या मालिकेसाठी फलंदाज रिंकू सिंगचीही भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. या आधी रिंकू सिंगला टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी संधी देण्यात आली न्हवती. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या शेवटच्या T-20 मालिकेत त्याला केवळ 2 धावा करता आल्या होत्या. त्याने पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात प्रत्येकी एक धाव घेतली हाती. दुसऱ्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. आता येणाऱ्या सिरीजमध्ये त्याला स्वतःची कामगिरी दाखवण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान रिंकू वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आला आहे. रिंकूने नुकताच एक टॅटू काढला आहे. याच टॅटूमुळे तो चर्चेत आला आहे.
ग्वाल्हेरमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या T20 सामन्याच्या आधी रिकूने शनिवारी BCC च्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर त्याच्या टॅटूचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या टॅटूचं नाव त्याने 'गॉड्स प्लान' टॅटू असं सांगितलं आहे. टॅटूबद्दल खुलासा करत त्याने सांगितले की हा टॅटू पाच षटकारांशी संबंधित आहे.
पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये रिंकू बोलताना दिसत आहे की, "प्रत्येकाला माहित आहे की मी माझे प्रसिद्ध नाव गोंदवले आहे - गॉड्स प्लान." आता काही आठवडे झाले आहेत आणि मला या नावाने थोडेफार लोक ओळखतात. मी कायमस्वरूपी टॅटू काढण्याचा विचार केला होता. या टॅटूचा अर्थ गॉड्स प्लान असा आहे. मी ज्या ठिकाणी पाच षटकार मारले ते या टॅटूमधून दाखवले आहेत. इथून माझे आयुष्य बदलले आणि लोक मला ओळखू लागले, म्हणून मला वाटले की मी असा टॅटू करून घेयायला हवा.
रिंकूने आयपीएल 2023 मध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्ससाठी शेवटच्या षटकात पाच षटकार मारले. यश दयालच्या षटकात त्याने हि खळबळ उडवून दिली होती. त्या एका खेळीने रिंकूचे करियर बदलून टाकले. पाच महिन्यांतच त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली.
१८ ऑगस्ट २०२३ रोजी जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली रिंकूने आयर्लंडविरुद्ध भारतीय टीममध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो भारतीय T-20 संघात आहे. रिंकूने आतापर्यंत 23 T20 सामन्यात 418 धावा केल्या आहेत.