IND vs SL Series: आज टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध सामना, कधी आणि कुठे पाहता Match?

Team India : नवीन वर्षाच्या सुरूवातीला टीम इंडिया आणि  श्रीलंकेविरुद्ध यांच्या सामना रंगणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार असून जाणून घ्या तुम्हाला भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना कुठे आणि कसा पाहता येईल.

Updated: Jan 3, 2023, 10:08 AM IST
IND vs SL Series: आज टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध सामना, कधी आणि कुठे पाहता Match?  title=
India vs sri lanka t20 and odi series

IND vs SL T20 Series :  भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून (03 January ) सुरुवात होत आहे. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. नवीन वर्षात विजयी सुरुवात करण्याचं लक्ष्य टीम इंडियानं (team India) ठेवलंय. कॅप्टन हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर टीम इंडियाची धुरा आहे. ही सीरिज जिंकत कॅप्टनची दावेदारी मजबूत करण्याची संधी हार्दिक पंड्याकडे आहे. रोहित, (rohit sharma) विराट (virat kohli) या अनुभवी क्रिकेटर्सच्या अनुपस्थितीत भारताच्या यंग ब्रिगेडच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल. तसेच श्रीलंकेचा संघ टी-20 नंतर एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. 

तिन्ही T20 सामन्यांचे वेळापत्रक 

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला टी-20 सामना 3 जानेवारी रोजी मुंबईत होणार आहे. दुसरा टी-20 सामना 5 जानेवारीला पुण्यात आणि तिसरा टी-20 सामना 7 जानेवारीला राजकोटमध्ये खेळवला जाईल. सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. म्हणजेच या सामन्यातील नाणेफेक संध्याकाळी 6.30 वाजता होईल.

तिन्ही एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक

तर दुसरीकडे भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना 10 जानेवारी रोजी गुवाहाटी येथे होणार आहे. त्यानंतर 12 जानेवारीला कोलकाता आणि 15 जानेवारीला तिरुअनंतपुरममध्ये सामने खेळवले जातील. सर्व एकदिवसीय सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होतील. म्हणजेच दुपारी एक वाजता नाणेफेक होणार आहे.

भारत-श्रीलंका सामना कुठे बघता येईल?

भारत-श्रीलंका मालिका डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney+ Hotstar) आणि त्याच्या वेबसाइटवर थेट प्रक्षेपित केली जाईल. याशिवाय स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports) टीव्हीवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण करणार आहे. मात्र, चाहत्यांनी लक्षात ठेवावे की सामने पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन आवश्यक आहे.

ज्या चाहत्यांना स्टार नेटवर्कचे (Star Sports) सदस्यत्व घ्यायचे किंवा सदस्यत्व घ्यायचे नसेल त्यांनी ते Jio, Airtel आणि VI रिचार्ज प्लॅनद्वारे डिस्ने प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शन (disney hotstar free subscription) मोफत घेऊ शकतात. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामने dd sports free to air वर थेट पाहता येतील. 

हार्दिक पंड्याच्या खांद्यावर टीम इंडियाची धुरा

एशिया कप 2022 मध्ये सुपर-12 राऊंडमध्ये श्रीलंकेने भारताला पराभवाचा धक्का दिला होता. भारत त्यामुळेच फायनल गाठू शकला नव्हता. तेव्हा त्याचा बदला घेण्याची संधी हार्दिक पंड्याच्या यंग ब्रिगेडकडे आहे. हार्दिक पांड्याने टी-20 कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी केली आहे. यावेळी त्यांचा सामना आशियाई चॅम्पियन श्रीलंकेशी होत आहे. श्रीलंकेचे खेळाडू लंका प्रीमियर लीगमध्ये चमक दाखवल्यानंतर येथे आले असून त्यांनी राष्ट्रीय संघात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश केला आहे. भारताने आपल्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली असून न्यूझीलंड मालिकेप्रमाणेच युवा संघ निवडला आहे.

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ: हार्दिक पंड्या (क), इशान किशन (विकेटकीपर), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (वीसी), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग , हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (सी), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव , अक्षर पटेल, मो. शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

भारताचा श्रीलंका दौरा:
पहिला T20 - 3 जानेवारी, मुंबई
दुसरा T20 - 5 जानेवारी, पुणे
तिसरा T20 - 7 जानेवारी, राजकोट
पहिली वनडे - 10 जानेवारी, गुवाहाटी
दुसरी वनडे - 12 जानेवारी, कोलकाता
तिसरी वनडे - 15 जानेवारी, तिरुवनंतपुरम