Rishbh Pant : ऋषभ पंतच्या अपघातावर कपिल देव यांची पहिली प्रतिक्रिया, 'त्या' वक्तव्याची एकच चर्चा!

त्या दिवसापासून माझ्या भावाने मला गाडीला हात लावू दिला नव्हता, कपिल देव यांनी शेअर केला खास किस्सा!

Updated: Jan 3, 2023, 11:30 AM IST
Rishbh Pant : ऋषभ पंतच्या अपघातावर कपिल देव यांची पहिली प्रतिक्रिया, 'त्या' वक्तव्याची एकच चर्चा!  title=

Kapil Dev on Rishbh Pant : भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंतचा 30 डिसेंबरला झालेल्या अपघतामुळे (Rishabh Pant Accident) संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ माजली होती. ऋषभ पंतवर सध्या रूग्णालयात उपचार सुरु असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पंतची बीएमडब्लू गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. नशीब बलवत्तर म्हणून पंत अपघातामधून वाचला म्हणावा लागेल. अशातच यावर भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी अपघातावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Kapil Dev on Rishbh Pant car Accident latest marathi news)

नेमकं काय म्हणाले कपिल देव?
हा एक धडा असून मी युवा क्रिकेटपटू होतो त्यावेळी माझाही टू-व्हीलरवर अपघात झाला होता. मात्र त्या दिवसापासून माझ्या भावाने मला गाडीला हात लावू दिला नव्हता. पंत नशिबवान आहे की तो सुरक्षित आहे. तुमच्याकडे एक चांगली लक्झरीअस कार आहे जी खूप वेगाने धावते. ती कार तुम्ही एकटे चालवण्याची गरज नसून एखादा ड्रायव्हर ठेवला तरी तुम्हाला तो परवडू शकतो. समजू शकतो की या वयात तुम्हाला जोश असतो पण तुमच्यावर काही जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे तुम्ही स्वत:ची काळजी घेतली पाहिजे, असं कपिल देव यांनी म्हटलं आहे. 

नेमका कसा आणि कुठे झाला अपघात?
दिल्ली-देहरादूनमधील हायवेवरून घरी जात असताना पहाटेच्या वेळी पंतची गाडी दुभाजकाला धडकून अपघात झाला. पंतची कार स्पीडमध्ये असल्याने दुभाजकाला धडकल्यावर चार ते पाचवेळा कारने पलटी मारली. अपघातानंतर या कारने पेट घेतला. पंत अपघातात गंभीर जखमी झाला होता. सध्या रूग्णालयात उपचार सुरु असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.