India vs England 3rd Test | कॅप्टन विराट कोहली रोहित शर्मावर भर मैदानात संतापला, नक्की काय झालं?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना (India vs England 3rd test)  खेळवला जात आहे.

Updated: Aug 26, 2021, 07:00 PM IST
India vs England 3rd Test | कॅप्टन विराट कोहली रोहित शर्मावर भर मैदानात संतापला, नक्की काय झालं? title=

लंडन : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. इंग्लंडने टीम इंडियाला पहिल्या डावात 78 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर इंग्लंडच्या सलामी जोडीने झोकात सुरुवात केली. रॉरी बर्न्स आणि हसिब हमिद या जोडीने 135 धावांची सलामी भागीदारी केली. ही जोडी मोहम्मद शमीने मोडून काढली. मात्र त्याआधी टीम इंडियाला पहिली विकेट मिळवण्याची संधी होती. मात्र स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माने कॅच सोडला. यामुळे ही संधी हुकली. रोहितने कॅच सोडल्याने कॅप्टन विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली. (India vs England 3rd test day 1 captain virat kohli angry on rohit sharma due to drop catch of  haseeb hameed at headingley leeds) 

नक्की काय झालं?

जसप्रीत बुमराह 37 वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर हा सर्व प्रकार घडला. बुमराहने टाकलेला बॉल हसीबच्या बॅटचा कट घेऊन स्लीपला उभ्या असलेल्या रोहितच्या दिशेने गेला. हा कॅच फार सोपाही नव्हता. मात्र रोहितकडून ही कॅच घेणं अपेक्षित होतं. पण रोहितकडून कॅच ड्रॉप झाला. रोहितच्या शेजारीच विराट उभा होता. रोहितने कॅच सोडल्याने विराटने संताप व्यक्त केला. दरम्यान रोहितने कॅच सोडल्याने बॉल बाऊंड्री लाईनच्या बाहेर गेला. परिणामी हसीब हमिदचं अर्धशतकही पूर्ण झालं.

टीम इंडियाची दाणादाण

दरम्यान त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 76 धावांवर आटोपला. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 19 तर अजिंक्य रहाणेने 18 धावांची खेळी केली.