Shah Rukh Khan चा मुलगा, Juhi Chawla ची मुलगी एकत्र येत उचलणार मोठं पाऊल

चाहत्यांच्या वर्तुळातून त्यांच्या या नव्या इनिंगसाठी आतापासूनच शुभेच्छा देण्यात येत आहेत.   

Updated: Aug 26, 2021, 04:49 PM IST
Shah Rukh Khan चा मुलगा, Juhi Chawla ची मुलगी एकत्र येत उचलणार मोठं पाऊल title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूडमध्ये आता असा काळ आला आहे, जिथं मोठमोठ्या सेलिब्रिटींच्या मुलांनी आपल्या आई- वडिलांच्या स्टारडममधूनच आपल्यासाठीही लोकप्रियतेचा ओढा तयार केला आहे. अशा सेलिब्रिटी किड्सच्या यादीत अभिनेता शाहरुख खान याच्या मुलांच्या नावाचाही समावेश होतो. 

शाहरुखच्या (Shah Rukh Khan) मुलाची बॉलिवूड एंट्री केव्हा होणार असा प्रश्न अद्यापही अनुत्तरित असतानाच आता त्यानं घेतलेल्या एका मोठ्या निर्णयानं साऱ्याचं लक्ष वेधलं आहे. शाहरुखच्या मुलानं घेतलेल्या या निर्णयामध्ये त्याला साथ मिळत आहे ती म्हणजे अभिनेत्री जुही चावला हिच्या मुलीची. 

शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान आणि जुही चावलाची (Juhi Chawla) मुलगी जान्हवी मेहता IPL लिलावादरम्यान एकत्र दिसले होते. तेव्हापासूनच या नवख्या जोडीनं सर्वांचं लक्ष वेधलं. 

शाहरुख खान आणि जुही चावला यांनी अनेक चित्रपटांच्या निमित्तानं स्क्रीन शेअर केली. ज्यानंतर 2013 मध्ये त्या दोघांनीही मिळून Dreamz Films Unlimited नावाची निर्मिती संस्था सुरु केली. त्यांच्या या प्रोजेक्टला फार यश मिळालं नाही. पण, पुढे आयपीएलमधील कोलकाता संघाच्या निमित्तानं जुही आणि शाहरुख पुन्हा एकत्र आले. 

दरम्यान, जान्हवी आणि आर्यन या दोघांनाही क्रिकेटमध्ये रस आहे, त्यांना हा खेळ समजतो, असं सांगत जुहीनं आपल्या मुलांच्या या नव्या इनिंगबद्दल आनंद व्यक्त केला. संघाच्या कामामध्ये हे दोघंही फार कुतूहल दाखवत असून, कामातही सहभागी होत आहेत. त्यांच्यावर हे करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव नाही, पण त्यांना या खेळातच रुची असल्यामुळं त्यांनी हे पाऊल उचललं असल्याचं जुहीनं माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.