रोहित नाहीतर भारताच्या 'या' खेळाडूची AUS टीमला दहशत, कर्णधार फिंचने केला खुलासा!

ऑस्ट्रेलियाच्या संघाला या खेळाडूची वाटते भीती 

Updated: Sep 19, 2022, 11:11 PM IST
रोहित नाहीतर भारताच्या 'या' खेळाडूची AUS टीमला दहशत, कर्णधार फिंचने केला खुलासा! title=

India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील टी-20 सीरिज (INDvsAUS) उद्यापासून म्हणजेच 20 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. येत्या वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर ही मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाची ठरणार आहे. टी-20 वर्ल्डकप (T-20 World Cup) हा ऑस्ट्रेलिया होणार आहे त्यामुळे या मालिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ॲरॉन फिंचने भारताच्या स्टार प्लेअरचा ऑस्ट्रेलिया संघाला दहशत असल्याचा खुलासा केला आहे. (Aron Finch Virat Kohli Dangerous Player Indian Cricket Team)

विराटला (Virat Kohli) कमी समजून चालणार नाही. जो कोण विराटला कमी समजत असेल तो एखादा हुशारच असेल. विराटने त्याच्या 15 वर्षांच्या  कारकिर्दीमध्ये जे काही केलं आहे त्यावरून तरी आपण त्याला कमी लेखू शकत नाहीत. महान खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे विराट टी-20 (T-20 Match) क्रिकेटमध्ये असा खेळाडू आहे ज्याने आपल्या खेळाला वाव दिला आहे, असं फिंचने म्हटलं आहे. 

सततच्या संघर्षामुळे वनडेतून निवृत्ती जाहीर केली होती. निवृत्तीनंतर फिंच प्रथमच मैदानात दिसणार आहे. टी-20 क्रिकेटमध्ये मला वाटतं की माझा फॉर्म बराच काळ चांगला आहे. मला वाटतं, जर तुम्ही एकदिवसीय आणि टी-20 फॉर्म वेगळे केलं तर ते योग्य आहे, असं फिंचने सांगितलं.

कोहलीने आशिया कपच्या शेवटच्या सामन्यामध्ये अफगाणिस्तानविरूद्ध 71 वा आंतरराष्ट्रीय शतक ठोकलं होतं. (Virat Kohli 71st Century) विराटने नाबाद 122 धावा करत टीका करणाऱ्यांची तोंड बंद केलीत. नोव्हेंबर 2019 नंतरचं त्याचं पहिले आंतरराष्ट्रीय शतक होते. आशिया चषक 2022 मध्ये सर्वाधिक धावा (Most Runs in Asia Cup 2022) करणारा कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने सहा सामन्यांमध्ये 147.59 च्या स्ट्राइक रेटने 276 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.