भारतासमोर विजयासाठी १९७ धावांचे आव्हान

भारताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने २० षटकांत १९६ धावा केल्यात. भारतासमोर विजयासाठी १९७ धावांचे आव्हान ठेवण्यात आलेय.

Updated: Nov 4, 2017, 08:39 PM IST
भारतासमोर विजयासाठी १९७ धावांचे आव्हान title=

राजकोट : भारताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने २० षटकांत १९६ धावा केल्यात. भारतासमोर विजयासाठी १९७ धावांचे आव्हान ठेवण्यात आलेय.

सलामीवीर कोलिन मुन्रोने नाबाद १०९ धावा झळकावताना संघाला १९६ धावांचा टप्पा गाठून दिला. त्याने ५८ चेंडूत १०९ धावा तडकावल्या. यात ७ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे. 

सलामीवीर मार्टिन गप्टिलने ४५ धावा केल्या. यामुळे पाहुण्या संघाने २० षटकांत दोन बाद १९६ धावा केल्या. 

भारताकडून मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.