मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 2022 ला (T20 World Cup 2022) अवघे काहीच दिवस बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच संघ तयारीला लागले आहे. टीम इंडिया या वर्ल्ड कपसाठी प्रबळ दावेदार समजली जात आहे. या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात (Indian Cricket Team) कोणाची निवड होणार, याबाबत सर्व क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. याच टीम सिलेक्शनबाबत कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) मोठी मोठं वक्तव्य केलंय. (india cricket team captain rohit sharma told about upcoming t 20i 2022 world cup squad)
"वर्ल्ड कपसाठी जवळपास अडीच महिने बाकी आहेत. याआधी आमच्याकडे आशिया कप, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळायचं आहे. या आव्हानासाठी आम्ही टीम म्हणून 80-90 टक्के तयार आहोत. नक्कीच परिस्थितीनुसार संघात 3-4 बदल होऊ शकतातं", अशी शक्यताही रोहितने बोलून दाखवली.
आगामी टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन हे ऑस्ट्रेलियात करण्यात आलंय. ऑस्ट्रेलियातील परिस्थिती ही गोलंदाजांसाठी अनुकूल असते. त्यामुळे संघात वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते.
"आशिया कपचं आयोजन हे खूप वर्षांनी होतंय. मात्र आम्ही गेल्या वर्षी दुबईत पाकिस्तान विरुद्ध खेळलोय. त्यावेळे निकाल आमच्या बाजूने लागला नाही. मात्र आशिया कप पूर्णपणे वेगळं आहे. टीम पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने खेळतेय. त्याच पद्धतीने तयारी केलीय. त्यामुळे अनेक बाबतीत बदल झालाय. आम्हाला परिस्थिती समजून घ्यायला हवी", असंही रोहितने नमूद केलं.
टीम इंडिया-पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा सामन्याची क्रिकेट विश्व आवर्जून वाट पाहत असतं. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याबाबत रोहितने प्रतिक्रिया दिली. आमच्यासमोर कोण आहे, याचा विचार आम्ही करत नाहीत. आम्ही विंडिज आणि इंग्लंडविरुद्धही असंच खेळलो होतो", असं रोहितने नमूद केलं.