IND vs WI: वेस्ट इंडिजविरूद्ध सामन्यात विराटच्या जागी 'या' खेळाडूला संधी

टीम इंडियात विराटची जागा 'हा' खेळाडू घेणार

Updated: Jul 18, 2022, 09:58 PM IST
IND vs WI: वेस्ट इंडिजविरूद्ध सामन्यात विराटच्या जागी 'या' खेळाडूला संधी  title=

मुंबई : टीम इंडिया २२ जुलैपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार तसेच सध्य़ा आऊट ऑफ फॉर्म असलेल्या विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्याजागी युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. मात्र आता विराटच्या स्थानी कोणता फलंदाज मैदानात उतरणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. याचेच उत्तर समोर आले आहे. 

विराट कोहली सध्या खूपच खराब फॉर्ममध्ये आहे. अनेक युवा खेळाडूंना विराट कोहलीमुळे संघात स्थान मिळत नाहीए. असे अनेक खेळाडू आहेत जे आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विराट कोहलीला जोरदार टक्करही देत आहेत. अशा परीस्थितीत  भारताचा हा धोकादायक फलंदाज वनडेमध्ये विराट कोहलीची जागा तिसऱ्या क्रमांकावर हिरावून घेऊ शकतो. हा फलंदाज विंडीजविरुद्ध सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर उतरणार आहे. 

सूर्यकुमार यादव वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत टीम इंडियासाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळणार असल्याचे मानले जात आहे. सूर्यकुमार यादव हा सध्या जगातील सर्वात धोकादायक फलंदाज मानला जातो. भारताला सूर्यकुमार यादवसारखा स्फोटक फलंदाज मिळाला आहे. जो मैदानात 360 अंशाच्या कोनात चौकार आणि षटकारांसह धमाकेदार फटकेबाजी करतो. त्यामुळे तिसऱ्या स्थानासाठी तोच प्रमुख दावेदार आहे.  

टी20 वेस्ट इंडिज संघ : निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप, शेमार ब्रूक्स, केसी कार्टी, जेसन होल्डर, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मायर्स, गुडाकेश मोती, कीमो पॉल, रोव्हमन पॉवेल, जेडेन सील्स.

 टी-20 साठी भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिष्णो, रवी बिष्णो , भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

वनडेसाठी भारताचा संघ: शिखर धवन (C), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (वीसी), शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल , अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग