IND vs WI 1st T20I | वेस्ट इंडिजने पहिला सामना जिंकण्यासाठी चिटिंग केली?

टीम इंडियाचे (Team India) माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavskar) यांनी संताप व्यक्त केला आहे.   

Updated: Feb 17, 2022, 09:44 PM IST
IND vs WI 1st T20I | वेस्ट इंडिजने पहिला सामना जिंकण्यासाठी चिटिंग केली? title=

मुंबई : टीम इंडियाने (Team India) वेस्ट इंडिजवर (West Indies) 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पहिला सामना जिंकत रोहितसेनाने विजयी सलामी दिली. मात्र ही मॅच जिंकण्यासाठी विंडिजने चिटिंग केल्याचं म्हटलं जात आहे. यावरुन टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavskar) यांनी संताप व्यक्त केला आहे.  (ind vs wi 1st t 20 team india former crickter sunil gavskar angry on west indies rostan chase)
   
वेस्ट इंडिजने खरंच चिटिंग केली?

टीम इंडियाच्या बॅटिंग दरम्यान कॅमेरा विंडिजचा खेळाडू रोस्टन चेसवर गेला. तेव्हा रोस्टनच्या हातात काळ्या रंगाची पट्टी दिसून आली. या मुद्द्यावरुन सुनील गावसकर यांनी संताप व्यक्त करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबतचं वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.   

सुनील गावसकर संतापले 

सुनील गावसकर यांनी सामन्यादरम्यान रोस्टनच्या हातावरील काळी पट्टी पाहली. तेव्हा यावर प्रश्न उपस्थित केले."एखाद्या खेळाडूने पूर्ण तळहात झाकणं ही बाब कायदेशीर आहे का?, तसेच हाताला काळी पट्टी लावल्याने खेळाडूला चेंडू पकडण्यासाठी फायदा होऊ शकतो. अशा प्रकारे या वस्तू सोबत ठेवणं किंवा त्याचा वापर करणं योग्य आहे का", असा संताप व्यक्त गावसकरांनी प्रश्न उपस्थित केले.  

दरम्यान या मालिकेतील दुसरा सामना हा 18 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. हा सामना मालिकेच्या दृष्टीने निर्णायक असणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून सीरिज जिंकण्याची संधी आहे. तर विंडिजसमोर मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं असेल. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.