IND vs WI, 2nd T20I | विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यासाठी अशी असेल प्लेइंग इलेव्हन

टीम इंडिया (Team India) विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दुसरी टी 20 मॅच  गुरुवारी 18 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.   

Updated: Feb 17, 2022, 07:56 PM IST
IND vs WI, 2nd T20I | विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यासाठी अशी असेल प्लेइंग इलेव्हन title=
प्रातिनिधिक छायाचित्र

कोलकाता : टीम इंडिया (Team India) विरुद्ध वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील दुसरा सामना 18 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. या 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. दुसरा सामना जिंकून टीम इंडियाला मालिका जिंकण्याची संधी आहे. दुसरा सामना मालिकेच्या दृष्टीने निर्णायक आणि महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दुसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतात. दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाचा संभाव्य संघ कसा असेल, हे आपण पाहुयात. (ind vs wi 2nd t20i team india probable playing eleven squad against west indies at ededn garden kolkata)

ओपनिंगची जबाबदारी कोणाकडे?  

या दुसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि  ईशान किशन हे दोघे ओपनिंग करणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. केएल राहुल दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे रोहितला साथ देण्यासाठी ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन हे दोन पर्याय आहेत. अशात ईशानचं स्थान पक्क मानलं जात आहे.    

मधल्या फळीत कोण? 

तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली खेळेल. त्यानंतर चौथ्या स्थानी विकेटकीपर रिषभ पंत असणार हे निश्चित आहे. तर सूर्यकुमार यादव 5 व्या क्रमांकावर खेळेल. बॉलिंग ऑलराऊंडर दीपक हुड्डा 6 व्या स्थानी असेल. दीपक हुड्डाला संधी मिळाली तर वेंकटेश अय्यरला डच्चू मिळू शकतो.  

गोलंदाजीची जबाबदारी कोणाकडे? 

रवी बिश्नोईला साथ देण्यासाठी चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवला संधी मिळू शकते. कुलदीपलास संधी मिळाल्यास युदवेंद्र चहलला बाहेर बसावं लागू शकतं. चहलने पहिल्या सामन्यात फार धावा लुटवल्या होत्या. 

तर दुसऱ्या बाजूला वेगवान गोलंदाजीची धुरा ही आयपीएल स्टार हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहर या तिघांचा समावेश निश्चित समजला जातोय. 

दुसऱ्या टी 20 सामन्यासाठी संभावित प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, दीपक चहर, हर्षल पटेल आणि भुवनेश्वर कुमार.