IND vs SL : रोहित-विराटची तुफान फटकेबाजी, टीम इंडियाचं श्रीलंकेसमोर डोंगराएवढं आव्हान

टीम इंडियाने (Team India) प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेला जिंकण्यासाठी 'इतक्या' रन्सचं आव्हान दिलं आहे. डोंगराएवढं आव्हान श्रीलंकेची टीम पार करणार का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Updated: Jan 10, 2023, 05:24 PM IST
IND vs SL : रोहित-विराटची तुफान फटकेबाजी, टीम इंडियाचं श्रीलंकेसमोर डोंगराएवढं आव्हान title=

IND vs SL 1st ODI : गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियममध्ये आज श्रीलंका विरूद्ध भारत (IND vs SL) यांच्यातील पहिला वनडे सामना खेळवण्यात आला. श्रीलंकेच्या टीमने टॉस (SL win Toss) जिंकून प्रथन गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाने (Team India) प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेला जिंकण्यासाठी 374 इतक्या रन्सचं आव्हान दिलं आहे. डोंगराएवढं आव्हान श्रीलंकेची टीम पार करणार का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. 

टीम इंडियाकडून विराट कोहलीचं तुफान शतक

पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने वादळी खेळी करत शतक (Virat Kohli Century) झळकावलं. कोहलीने 80 बॉल्समध्ये 100 रन्स केले. मात्र 113 रन्सवर त्याला पव्हेलियनमध्ये परतावं लागलं. कोहलीने 73 वं शतक पूर्ण (Virat Kohli 73th Century) केलं आहे. तर विराट कोहलीने आज वनडेमधील 45 वं शतक ठोकलंय. त्यामुळे त्याने महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरच्या महान रेकॉर्डची बरोबरी केलीये.

रोहित शर्माची कॅप्टन इनिंग

कमबॅकच्या सामन्यात रोहित शर्माने श्रीलंकेच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. रोहितने पहिल्या वनडे सामन्यात तुफानी फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं आहे. आजच्या या सामन्यात रोहितने 83 रन्सची खेळी केली. ज्यामध्ये रोहितने 6 फोर आणि 2 सिक्स मारले. वनडे करियरमधील रोहितचं हे 47 वं अर्धशतक होतं. 

टीम इंडियाची उत्तम ओपनिंग

भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनीही तुफान खेळी करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. यावेळी हिटमॅन चांगल्याच फॉर्ममध्ये दिसून आला. दुखापतीतून कमबॅक करत तुफान फलंदाजी केली आणि अर्धशतक ठोकलं आहे. ज्यानंतर रोहित शर्माने एकदम खास पद्धतने हाफ सेंच्युरीचं सेलिब्रेशन देखील केलं.

भारतीय फलंदाजांनी आज चांगली कामगिरी केली. रोहितसोबत ओपनिंगला उतरलेल्या शुभमन गिलने देखील 70 रन्सची खेळी केली. दुसरीकडे श्रेयस अय्यरला मात्र मोठी खेळी करता आली नाही. केवळ 28 रन्सवर तो माघारी परतला. विकेटकीपर केएल राहुलने देखील 39 रन्सची खेळी केली. श्रीलंकेकडून कसून रजिथा याने सर्वाधिक म्हणजेच 3 विकेट्स काढले आहेत.