Virat Kohli Century: अनस्टॉपेबल 'कोहली'... श्रीलंकेविरुद्ध वादळी शतक; सचिनच्या बड्या रेकॉर्डची बरोबरी!

India vs Sri Lanka: श्रीलंकेविरुद्धच्या (IND vs SL) टी-20 मालिकेत विश्रांती घेतल्यानंतर विराट कोहली वनडे (Virat Kohli) मालिकेत परतला. आजच्या सामन्यात सेंच्युरी केल्याने कोहलीने सचिन तेंडूलकरच्या आणखी एका रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

Updated: Jan 10, 2023, 05:30 PM IST
Virat Kohli Century: अनस्टॉपेबल 'कोहली'... श्रीलंकेविरुद्ध वादळी शतक; सचिनच्या बड्या रेकॉर्डची बरोबरी! title=
Virat Kohli Century

IND vs SL, Virat Kohli: भारत आणि श्रीलंका (IND vs SL LIVE) यांच्यामध्ये 3 सामन्यांच्या वनडे सिरीजला (ODI series) आजपासून सुरुवात झाली आहे. या सिरीजमधील पहिला सामना 10 जानेवारी म्हणजेच आजपासून खेळवला जातोय. पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने वादळी खेळी करत शतक (Virat Kohli Century) झळकावलं. कोहलीने 80 चेंडूमध्ये 100 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने 73 वं शतक पुर्ण (Virat Kohli 73th Century) केलं आहे. तर विराट कोहलीने आज वनडेमधील 45 वं शतक ठोकलंय. त्यामुळे त्याने महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरच्या (Sachin Tendulkar) महान रेकॉर्डची (record of most ODI centuries) बरोबरी केली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या (IND vs SL) टी-20 मालिकेत विश्रांती घेतल्यानंतर विराट कोहली वनडे मालिकेत परतला. विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या 47 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8 शतके झळकावली होती आणि सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar Record) 84 सामन्यात 8८ शतके झळकावली आहेत. या मालिकेत विराटने एक शतक केल्यानंतर त्याने सचिन तेंडूलकरचा रेकॉर्ड मोडला आहे. (India vs Sri Lanka Virat Kohli Century Equal to Sachin Tendulkar's record for most ODI centuries at home)

कोहलीची मायदेशात 19 एकदिवसीय शतकं होती, तर सचिन तेंडुलकरने भारतात 20 शतकं झळकावली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात सेंच्युरी केल्याने कोहलीने सचिन तेंडूलकरच्या आणखी एका रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

आणखी वाचा - IND vs SL : रोहित-विराटची तुफान फटकेबाजी, टीम इंडियाचं श्रीलंकेसमोर डोंगराएवढं आव्हान

दरम्यान, टीम इंडियाने (Team India) प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेला जिंकण्यासाठी 374 इतक्या रन्सचं आव्हान दिलं आहे. डोंगराएवढं आव्हान श्रीलंकेची टीम पार करणार का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. कमबॅकच्या सामन्यात रोहित शर्माने श्रीलंकेच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. रोहितने पहिल्या वनडे सामन्यात तुफानी फलंदाजी करत अर्धशतक (half century) ठोकलं आहे.