IND vs PAK : अर्शदीप सिंह मैदानात असताना आई काय करते? जाणून घ्या

अर्शदिप सिंहच देखील 'त्या' दिग्गज खेळाडूप्रमाणेच आहे, तो मैदानात असताना आई 'ही' गोष्ट करत असते? तुम्हाला माहितीय का?

Updated: Oct 24, 2022, 08:14 PM IST
IND vs PAK : अर्शदीप सिंह मैदानात असताना आई काय करते? जाणून घ्या  title=

पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कप (t20 World Cup) सामन्यात टीम इंडियाने (Team India) रविवारी पाकिस्तानवर 4 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार विराट कोहली (Virat Kohli) ठरला आहे. मात्र कोहलीसह हे श्रेय हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि अर्शदिप सिंहला (Arshdeep Singh) देखील जाते. त्यांनी या सामन्यात दिमाखदार कामगिरी केली आहे. अर्शदिपने अशी कामगिरी पाहून त्याने एकप्रकारे ट्रोलर्सनाच प्रत्युत्तर दिल्याचे बोलले जात आहे. या दरम्यान आता अर्शदीप बाबतचा एक किस्सा समोर आला आहे. हा किस्सा काय आहे तो जाणून घेऊयात.  

हे ही वाचा : ...म्हणून विराटला चेस मास्टर म्हणतात, त्याचे मैदानावरचे आकडेच सांगतात 

ट्रोलर्सना करारा जवाब

अर्शदिप सिंहने (Arshdeep Singh) आशिया कपमध्ये पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात आसिफ अलीची कॅच सोडली होती. या एका कॅचवरून त्याला खुप वाईट पद्धतीने ट्रोल करण्यात आले होते. काहींनी त्याला खलिस्तानी म्हटले होते, तर काहींनी त्याला गद्दार म्हटलं होतं. मात्र रविवारी टी20 वर्ल्ड कपमधील (t20 World Cup) सामन्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. त्याने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान, कर्णधार बाबर आझम आणि आसिफ अली या खेळाडूंची विकेट घेतली. त्याने असा परफॉर्मन्स करून एकप्रकारे ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले आहे. अशाप्रकारे त्याने टीम इंडियाच्या (Team India) विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी ज्यावेळेस मैदानात असायचा, त्यावेळेस त्याची आई देवघरातील मंदिरासमोर बसून देवाची प्रार्थना करायची, असे आपण एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात आपण पाहिले असेलच. असेच या टीम इंडियाचा युवा गोलंदाज अर्शदिप सोबत घडते. 

हे ही वाचा : टी20 वर्ल्ड कपमध्ये स्टार खेळाडूची आतषबाजी,टीम इंडियासाठी ठरणार घातक 

अर्शदिपची आई काय करते?

अर्शदीप सिंहची (Arshdeep Singh) आई बलजीत कौर आपल्या मुलाला गोलंदाजी करताना क्वचितच पाहते. बलजीत कौर यांनी एका न्यूज चॅनेलशी संवाद साधताना सांगितले की, जेव्हा अर्शदीप खेळतो तेव्हा ती सामन्यादरम्यान गुरुद्वारामध्ये असते किंवा गुरु नानक देवजींच्या समोर पूजा करत असते. पुढे बलजीत कौर म्हणाल्या की, (Arshdeep Singh)  'अर्शदीप पहिल्यांदा भारताकडून खेळला तेव्हापासून याची सुरुवात झाली. तो नेहमीच कठीण ओव्हर्स टाकतो. मला या खेळाबद्दल फारशी माहिती नाही. पण त्याच्याविरुद्ध धावा करताना फलंदाजांना दिसत नाही, असे त्या म्हणाल्या होत्या.

दरम्यान टीम इंडियाने (Team India) हा विजय मिळवून देशवासियांना दिवाळीचे गिफ्ट दिले आहे. या विजयानंतर आता टीम इंडियाच्या आगामी मॅचची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागली आहे.