IND vs PAK : पाकिस्तानविरुद्ध रोहितचा 'हिट'मॅन शो, शादाबला दिवसाढवळ्या दाखवल्या चांदण्या; पाहा Video

Shadab Khan vs Rohit Sharma : 29 बॉलमध्ये रोहित शर्माने फक्त 10 धावा केल्या होत्या. त्यानंतर रोहितने घेर टाकला. पाकिस्तानला त्यांची 13 वी ओव्हर महागात पडली. शादाब खानला रोहित शर्माने चांदण्या दाखवल्या. 

Updated: Sep 10, 2023, 05:48 PM IST
IND vs PAK : पाकिस्तानविरुद्ध रोहितचा 'हिट'मॅन शो, शादाबला दिवसाढवळ्या दाखवल्या चांदण्या; पाहा Video title=
IND vs PAK 13 over shadab khan vs rohit sharma

Rohit Sharma Viral Video : आशिया कपच्या सुपर-4 मधील तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात खेळवला जातोय. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने अर्धशतक ठोकलं. तर शुभमन गिलने (Shubhman Gill) टीम इंडियाला 58 धावा करत भक्कम पाया रचून दिलाय. टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले असून आता विराट कोहली आणि केएल राहुल मैदानात आहे. मात्र, पावसाने आडकाठी केल्याने सामना थांबवण्यात आलाय. सलामीला उतरलेल्या जोडीने पाकिस्तानची फलंदाडी फोडून काढली. त्यात सर्वात महत्त्वाचा रोल होता... रोहित शर्मा याचा.

रोहित शर्माने सुरूवातीला सावध फलंदाजी केली अन् एक बाजू सांभाळून ठेवली. तर सलामीवीर शुभमन गिल आपल्या फॉर्मनुसार खेळत होता. शुभमनने आपल्या लयीत फलंदाजी केली अन् चांगली धावसंख्या उभी केली. 29 बॉलमध्ये रोहित शर्माने फक्त 10 धावा केल्या होत्या. त्यानंतर रोहितने घेर टाकला. पाकिस्तानला त्यांची 13 वी ओव्हर महागात पडली. शादाब खानला रोहित शर्माने चांदण्या दाखवल्या. एकाच ओव्हरमध्ये रोहितने दोन खणखणीत सिक्स अन् एक फोर मारला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय.

पाहा Video

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (W), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रॉफ