व्यंकटेश अय्यरसाठी सामन्याआधी 'तो' ठरला सर्वात मोठा भावुक क्षण

व्यंकटेश अय्यर टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या सामन्यातून पदार्पण केलं.

Updated: Nov 17, 2021, 07:59 PM IST
व्यंकटेश अय्यरसाठी सामन्याआधी 'तो' ठरला सर्वात मोठा भावुक क्षण title=

जयपूर: न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरिजमधील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात शाहरुख खानच्या कोलकाता संघातील धडाकेबाज खेळाडूला संधी देण्यात आली आहे. व्यंकटेश अय्यर टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या सामन्यातून पदार्पण केलं आहे.

रोहित शर्माने सामन्याआधी व्यंकटेशला खास कॅप दिली. हा व्यंकटेशसाठी सर्वात आनंदाचा क्षण होता. व्यंकटेशला आंतरराष्ट्रीय टी 20 फॉरमॅटमध्ये डेब्यू केल्यानंतर एक खास कॅप दिली. त्यानंतर टीममधील सर्वांनी त्याला अभिनंदन केलं आणि मिठी मारली. हा क्षण खूप आनंदाचा पण तेवढाच भावुक करणारा होता. 

BCCI ने याचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. व्यंकटेश अय्यर IPL मध्ये 10 सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने 3 विकेट्स घेतल्या आणि 10 सामन्यात 370 धावा केल्या आहेत. त्याच्या कामगिरीचं फळ म्हणून त्याला टीम इंडियात टी 20 फॉरमॅटमध्ये संधी मिळाली आहे.

आजच्या सामन्यातून मला खूप काही शिकायला मिळणार आहे. कर्णधार रोहितने मला संधी दिली. या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न असणार आहे अशी भावना व्यंकटेश अय्यनं व्यक्त केली. 

जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर हा सामना होत आहे. रोहित शर्मा टी 20 सीरिजमध्ये कर्णधार आहे. टीम इंडियाने पहिल्यांदा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंड संघ पहिल्यांदा फलंदाजी करत आहे. 

टीम इंडिया Playing XI

रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, मोहम्मद सिराज

न्यूझीलंड टीम Playing XI

टिम साउथी (कर्णधार), मार्टिन गुप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट, रचिन रवींद्र, मिचेल सॅन्टनर, टॉड अॅस्टल, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट