मुंबई: टी 20 वर्ल्ड कपमध्ये विराट सेनेची कामगिरी अत्यंत लाजीरवाणी होती. आता टी 20 संपताच न्यूझीलंड विरुद्ध टी 20 आणि कसोटी सीरिज घरच्या मैदानात होत आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिजकडे सर्वांचं लक्ष आहे. टी 20 सीरिजचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. टी 20 सीरिज सुरू होण्याआधी किवी संघाला मोठा धक्का बसला आहे.
टी 20 सीरिजआधी टीम इंडियाला आनंदाची बातमी मिळाली आहे. न्यूझीलंड संघातून केन विल्यमसन खेळणार नाही. त्याच पाठोपाठ आता आणखी एक वेगावान गोलंदाज संघातून बाहेर गेला आहे. टी 20 सीरिजमधून बाहेर जाण्याचा निर्णय किवी संघाला वेगवान गोलंदाज काइल जेमिनसनने घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काइलला सध्या कसोटी सीरिजवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. त्यामुळे त्याने टी 20 सीरिजमधून माघार घेतल्याचं सांगितलं जात आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना 25 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे तो टी 20 सीरिजमध्ये खेळणार नाही अशी माहिती मिळाली आहे.
एनजेड यांनी दिलेल्या माहितीनुसार केन आणि काइलशी बोलल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. त्याच्या निर्णयाला टीमनेही सहमती दर्शवली आहे. तर संघातील आणखी काही खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता आहे.
टीम इंडिया संभाव्य Playing XI
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल.
न्यूझीलंड टीम संभाव्य Playing XI
मार्टिन गुप्टिल, डॅरिल मिशेल, टिम सीफर्ट, ग्लेन फिलिप्स (विकेटकीपर), मार्क चॅपमन, मिचेल सॅन्टनर, जेम्स नीशम, टिम साउथी (कर्णधार), लॉकी फर्ग्युसन, ईश सोधी, ट्रेन्ट बोल्ट.
टीम इंडिया स्क्वाड
रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत (विकेटकीप), के एल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, आर अश्विन, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, इशान किशन, व्यंकटेश अय्यर ऋतुराज गायकवाड.
न्यूझीलंड स्क्वाड
टिम साउथी (कर्णधार), टिम सीफर्ट (विकेटकीपर), मार्टिन गुप्टिल, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, मिचेल सॅन्टनर, लॉकी फर्ग्युसन, काइल जेमिसन, ट्रेंट बोल्ट, ईश सोधी, टॉड अॅस्टल, अॅडम मिल्ने.