IND vs ENG: मॅचआधीच रोहित शर्मा जखमी, विना कॅप्टन मैदानात उतरणार टीम इंडिया?

वर्ल्ड कप 2023 मध्ये अपराजित असलेली टिम इंडिया आज गत वर्षाचे विजेते इंग्लंडसोबत भिडणार आहे. सामना जिंकण्यासाठी टिम इंडियाकडून रणनिती आखण्यात आली आहे. दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा सरावादरम्यान जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. याच कारणामुळे रोहित इंग्लंडविरुद्धच्या सामन्यालाही मुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Oct 29, 2023, 11:49 AM IST
IND vs ENG: मॅचआधीच रोहित शर्मा जखमी, विना कॅप्टन मैदानात उतरणार टीम इंडिया? title=

IND vs ENG: वर्ल्ड कप 2023 मध्ये अपराजित असलेली टिम इंडिया आज गत वर्षाचे विजेते इंग्लंडसोबत भिडणार आहे. सामना जिंकण्यासाठी टिम इंडियाकडून रणनिती आखण्यात आली आहे. दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा सरावादरम्यान जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. याच कारणामुळे रोहित इंग्लंडविरुद्धच्या सामन्यालाही मुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

भारतीय कर्णधार रोहित शर्माला मनगटाची दुखापत झाली आहे. यामुळे रोहितच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रोहित शर्मा आजचा सामना खेळला नाही तर टीम इंडियासाठी हा मोठा धक्का असेल. क्रिकेट वेबसाईट इनसाइडस्पोर्ट्सने यासंदर्भात वृत्त दिले आहे. रोहित 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे. टिमला चांगली सुरुवात करुन देत धावसंख्येत भर टाकत आहे. 

दुखापतीमुळे भारतीय कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या आजच्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाईल. रोहित शर्माची दुखापत हा संघासाठी मोठा धक्का ठरू शकतो. कारण कर्णधार जबरदस्त फॉर्ममध्ये असून संघाला स्फोटक सुरुवात देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. इंग्लंडविरुद्ध विजय मिळवण्यासाठी रोहितचे संघातील स्थान खूप महत्वाचे आहे. 

रोहितची वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी 

भारतीय कर्णधार रोहित शर्मा विश्वचषक 2023 मधील आपल्या पहिल्याच सामन्यात शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला, पण त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर रोहितने शतक आणि अर्धशतक झळकावले. एवढेच नव्हे तर त्याने महत्त्वाच्या सामन्यांमध्ये स्फोटक फलंदाजी केली आणि दोन सामन्यांमध्ये 48 आणि 46 धावांची शानदार खेळीही खेळली. रोहितने वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 5 सामन्यात 311 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत त्याची दुखापत भारतासाठी मोठा धक्का ठरू शकते. कारण याआधी हार्दिक पंड्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता.