IND vs BAN : चित्यासारखा तेजतरारsss, शाकिबचा कॅच पकडत व्याजासकट केली परतफेड

उगाच नाही किंग म्हणत, कोहलीचा कॅच पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

Updated: Dec 4, 2022, 07:23 PM IST
IND vs BAN : चित्यासारखा तेजतरारsss, शाकिबचा कॅच पकडत व्याजासकट केली परतफेड title=

IND vs BAN : बांगलादेशच्या दमदार गोलंदाजीविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा डाव 186 धावांत आटोपला. मात्र हार मानेल तो कसला भारतानेही कडवी झुंज दिली. या सामन्यात बांगलादेशच्या शाकिब अल हसनने 5 विकेटस् घेत भारताला बॅकफूटवर टाकलं. बांगलादेशचीही खराब सुरूवात झाली असून सहज जिंकतील असं वाटत असणारा सामना भारताने फिरवला होता. या सामन्यात विराट कोहलीलाही (Virat Kohli) मोठी खेळी करता आली नाही, त्याला 9 धावांवर शाकिबने बाद केलं. (IND vs Ban Trending virat Kohli catch shakib al hasan viral video INd vs Ban latest marathi sport news)

बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने कोहलीचा अप्रतिम झेल पकडला, जो पाहून विराट स्वतःही आश्चर्यचकित झाला. 11व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कोहलीला कव्हर्सवर शॉट मारायचा होता, पण चेंडू थांबून आला. त्यामुळे विराटने हा चेंडू खेळल्यानंतर तो हवेत गेला आणि थोडा लांब असलेल्या लिटन दासने (Litton Das) डायव्ह टाकून एका हाताने शानदार झेल घेतला. हा अप्रतिम झेल पाहून कोहलीही आश्चर्यचकित झाला होता.  

कोहलीनेही शाकिब अल हसनचा एक अप्रतिम झेल घेतला आहे. विराट कोहली जसा अवाक झाला होता त्यापेक्षा अफलातून कॅच विराटने घेतला आहे. डाव्या बाजूला एका हातात जम्प करत बॉल पकडला. शाकिबच्या विकेटमुळे बांगलादेश आणखी अडचणीत गेला. कारण विकेट्स गेलेल्या असताना शाकिब मैदानावर तळ ठोकण्याच्या इराद्यात होता. मात्र विराटने त्याला आपल्या अफलातून झेलमुळे तंबूचा मार्ग दाखवला. 

दरम्यान, भारताला विजयासाठी एका विकेट्ची गरज आहे. बांगलादेशचे मेहेंदी हसन आणि मुस्तफिजूर रहमान दोघे मैदानात आहेत. 1 विकेट घेतली की भारत विजयी नाहीतर 30 धावा केल्या तर बांगलादेशचा विजय होणार आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x