india vs bangladesh: न्यूझीलंडविरुद्ध (Team India) झालेल्या पावसाळी पराभवानंतर आता टीम इंडिया बांग्लादेशच्या (India tour of Bangladesh, 2022) दौऱ्यावर आहे. भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका आणि दोन कसोटी सामने देखील खेळले जाणार आहेत. पहिल्या सामन्यात (India vs Bangladesh, 1st ODI) भारतीय फलंदाजांची दैणा उडाली. टीम इंडिया पुर्ण 50 ओव्हर देखील खेळून काढत्या आल्या नाहीत. बांग्लादेशचा स्टार ऑलराऊंडर शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) भीम पराक्रम नावावर केलाय.
बांगलादेशच्या दमदार गोलंदाजीविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात (IND vs BAN, 1st ODI) भारताचा डाव 186 धावांत गुंडाळला. बांगलादेशच्या शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) 5 विकेट तर इबादतने 4 बळी घेत भारतीय संघाला गुढघे टेकायला लावले आहेत.
बांग्लादेशने टीम इंडियाचा 41.2 ओव्हरमध्ये डाव गुंडाळला. भारताने 186 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर बांग्लादेशला 187 धावांचं लक्ष दिलंय. त्यामुळे आता संघात सुर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) कमतरता पुन्हा जाणवू लागली आहे. पॉवरप्ले संपल्यानंतर शाकिबच्या हातात बॉल आला. त्यानंतर शाकिबने 11 व्या ओव्हरमध्ये कमाल करत रोहित (Rohit Sharma) आणि विराटला (Virat Kohli) तंबूत परतवलं.
दरम्यान, वनडे फॉरमॅटमध्ये (ODI) रोहित शर्मा आणि विराट कोहलीला एकाच षटकात दोनदा बाद करणारा शाकिब हा पहिला बांगलादेशी (Bangladeshi Player) खेळाडू ठरला आहे. दोघांना बाद करताच नवा विक्रम त्याने स्वत:च्या नावावर केलाय. याआधी 2010 मध्ये झालेल्या आशिया चषकात शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan New Record) हा पराक्रम करून दाखवला होता.