IND VS BAN Test R Ashwin Scored Century : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट सीरिज खेळवण्यात येत आहे. या सीरिजच्या पहिल्या सामन्याला चेन्नईत गुरुवारपासून सुरुवात झाली असून यात भारताचा स्टार क्रिकेटर आर अश्विनने दणदणीत शतक ठोकलं आहे. इनिंगच्या सुरुवातीला मोठ्या विकेट्स गमावल्यावर टीम इंडिया संकटात असताना आर अश्विन मैदानात पाय रोवून उभा राहिला.
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर गुरुवारी भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्याचा पहिला दिवस पार पडला. यात सुरुवातीला बांगलादेशच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला बांगलादेशच्या बॉलिंग अटॅक समोर टीम इंडियाची फलंदाजी ढासळली, पहिल्या 10 ओव्हरमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुभमन गिल या तिघांची विकेट पडली. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंतने टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीवेळाने त्यांच्या पार्टनरशिपला देखील बांग्लादेशच्या बॉलिंगने छेद दिली. त्यानंतर सातव्या विकेटसाठी आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी मोठी पार्टनरशिप केली.
आर अश्विन हा भारताचा दिग्गज गोलंदाज आहे. मात्र वेळ आल्यावर तो फलंदाजीतही चांगली कामगिरी करू शकतो हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. टीम संकटात असताना आर अश्विनने मैदानात टिकून राहत चौफेर फटकेबाजी केली. त्याने या दरम्यान 10 चौकार आणि 2 सिक्स ठोकले. अश्विनने 108 बॉलमध्ये 100 धावा पूर्ण केल्या.
A stellar TON when the going got tough!
A round of applause for Chennai's very own - @ashwinravi99
LIVE - https://t.co/jV4wK7BgV2 #INDvBAN @IDFCFIRSTBank pic.twitter.com/j2HcyA6HAu
— BCCI (@BCCI) September 19, 2024
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज
शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा