'संवाद अर्धवटच राहिला, नंतर फोनच लागला नाही' हिंगोलीचा तरूण अभियंता इराणमध्ये बेपत्ता

Crime News Today: हिंगोलीतील तरुण इराण येथे कामासाठी गेला असतानाच तो बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी त्याच्या पत्नीने मदतीची मागणी केली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 27, 2024, 12:57 PM IST
 'संवाद अर्धवटच राहिला, नंतर फोनच लागला नाही' हिंगोलीचा तरूण अभियंता इराणमध्ये बेपत्ता title=
hingoli enginer missing in iran from past 20 days

Crime News Today: हिंगोलीच्या वसमत येथील पांचाळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. योगेश पांचाळ हे इंजिनिअर असून ते कामानिम्मित इराणला गेले होते. मात्र, गेल्या 20 दिवसांपासून त्याच्याशी संपर्कच होत नाहीये. त्यामुळं कुटुंब चिंतेत आहेत. माझ्या पतीला मायदेशी परत आणा, अशी मागणी योगेशच्या पत्नीने केली आहे. 

हिंगोलीच्या वसमत येथील योगेश पांचाळ हे इंजिनिअर आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी श्रीयोग एक्स्पोर्ट नावाची कुलर कंपनी सुरू केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून आपल्याला काय काय नवीन करता येऊ शकते, याची माहिती घेण्यासाठी योगेश 5 डिसेंबरला इराणला गेला होता. तेहराण येथील येथील हेरिटेज हॉस्टेल येथे तो मुक्कामी थांबला होता. 

इराणला गेला असतानाही योगेश आणि त्याची पत्नी श्रद्धाबरोबर त्याचे फोनवर बोलणं होत होतं. मात्र, एकदिवस फोन वर बोलत असतांना इकडे काही तरी बोलणं सुरू आहे. तुला परत कॉल करतो, म्हटला पण आजपर्यंत योगेशचा पुन्हा फोन आला नाहीये. शिवाय इकडून संपर्क केला तर फोन बंद येतोय. त्यामुळे योगेशचे कुटुंबीय चिंतेत सापडले आहेत. 

ज्या कंपनीची माहिती घेण्यासाठी योगेश इराणला गेले आहेत. त्याच्या मालकाशी योगेशच्या कुटुंबीयांचा संपर्क झाला असून योगेश नेमका कुठे आहे हे. मात्र अद्याप समजू शकले नाहीये. त्यामुळे योगेशच्या कुटुंबीयांनी भारतीय दूतावासाकडे संपर्क साधला असता भारतीय दूतावासाकडून ही प्रतिसाद मिळत नसल्याचं योगेशच्या पत्नीने म्हटलंय. माझ्या पतीला मायदेशी परत आणा अशी मागणी श्रद्धा भारत सरकारकडे करतेय.

अंधाधुंद गोळीबार करून पत्नीचा खून करणारा पोलीस निलंबित

दरम्याम, हिंगोलीत आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. हिंगोलीत कौटुंबिक वादातून पत्नी,सासू आणि मेव्हन्यावर पोलीस अमलदारानेच सहा गोळ्या फायर करीत पत्नीला ठार केले होते, तर या घटनेत सासू मेव्हणा आणि त्याचा 2 वर्षाचा मुलगा जखमी झाला होता. गुरुवारी रात्री आरोपी पोलीस अंमलदार विलास मुकाडेला पोलिसांनी अटक करून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात खून आणि खुनाचा प्रयत्न यासह विविध कलमान्वये त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यांनतर विलास मुकाडेला हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी निलंबित करीत त्याची विभागीय चौकशी करण्याचे आदेश काढलेत.