Australia Test squad for India Series: 9 फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus Test Series) कसोटी सामना होणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेसाठी आणि भारत दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाने जाहिर केलेल्या 18 सदस्यीय संघात 22 वर्षीय युवा फिरकी गोलंदाज टॉड मर्फीचा समावेश करण्यात आला असून भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात 4 फिरकीपटूंना स्थान दिले आहे.
ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर 4 कसोटी सामने आणि 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही कसोटी मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी कांगरू संघात चार फिरकीपटूंचा समावेश असणार आहे. ऑफस्पिनर टॉड मर्फीची (Todd Murphy) उत्कृष्ट कामगिरी पाहून त्याला संघात स्थान देण्यात आले. त्याचबरोबर नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मिशेल स्वेपसन आणि अॅश्टन आगर (Ashton Agar) यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. याशिवाय पीटर हँड्सकॉम्बने 2019 नंतर पुनरागमन करणार आहे.
वाचा: राजामौलींच्या RRR ने रचला इतिहास , Naatu Naatu गाणं ठरलं सर्वोत्कृष्ट
ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (क), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (व्हीसी) मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर
JUST IN: Australia have announced their 18-player Test squad for the crucial #WTC23 series against India starting in February.
Full squad https://t.co/QmKO5DFVdO
— ICC (@ICC) January 11, 2023
9-13 फेब्रुवारी: पहिली कसोटी, नागपूर
17-21 फेब्रुवारी: दुसरी कसोटी, दिल्ली
1-5 मार्च: तिसरी कसोटी, धर्मशाला
9-13 मार्च: चौथी कसोटी, अहमदाबाद
17 मार्च: पहिला एकदिवसीय, मुंबई, संध्याकाळी 7 वाजता
19 मार्च: दुसरी वनडे, विझाग, संध्याकाळी 7 वाजता
22 मार्च: तिसरी वनडे, चेन्नई, संध्याकाळी 7 वाजता