Mohammed Shami runs out Dasun Shanaka video: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli) शानदार शतकानंतर टीम इंडियाने (IND vs SL 1st ODI Match) पहिल्या सामन्यात दणदणीत विजय नोंदवला आहे. गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा पहिल्या वनडे सामन्यात 67 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने सामना जिंकला असला तरी श्रीलंकेच्या फलंदाजांनी चिवट झुंज दिली. सामन्यात खास राहिली दासून शनाकाची (Dasun Shanaka) सेंच्युरी... (Watch video Crazy scenes as Shami runs out Shanaka at non striker end Rohit later withdraws appeal marathi News)
भारताचे 374 धावांचे आव्हान पार करताना श्रीलंकेचे सुरूवातीचे फलंदाज पत्त्यासारखे बाद होत होते. त्याचवेळी मैदानात उतरलेल्या दसुन शानकाने (Dasun Shanaka Century) झुंजार शतक ठोकलं. त्याने 108 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला अखेरपर्यंत झुंज द्यावी लागली. या सामन्यातील अखेरच्या षटकात कॅप्टन शनाकाने शतक पूर्ण केलं. त्या अखेरच्या ओव्हरमध्ये (Mohammed Shami Last Over) नाट्यमय घडामोड पहायला मिळाली आहे.
कॅप्टन रोहितने (Rohit Sharma) अखेरची ओव्हर टाकण्यासाठी शमीच्या हातात बॉल सोपावला. शेवटच्या षटकात शनाका 98 धावांवर खेळत होता. त्यावेळी शमीने नाट्यमय खेळ दाखवला. शमी बॉलिंग करत असताना नॉन स्ट्रायकर एन्डच्या दिशेने शनाकाला रनआऊट केलं. त्यानंतर शमीने हळूच रन आऊटची (Run Out) अपिल केली. त्यावर शनाका बाद झाला होता.
आणखी वाचा - Umran Malik: बॉल आहे की बंदुकीची गोळी! उमरान मलिक झाला वेगाचा बादशाह; सर्व रेकॉर्ड मोडले
This is really a heart warming moment for all of us when shami out danush shanaka at non strikers end at 98 runs but Rohit Sharma withdrawal that appeal..#ViratKohli #RohitSharma #shanaka @BCCI @ImRo45 pic.twitter.com/k9U4aFzaLM
— Bunty Roy (@BantyKu56086743) January 10, 2023
दरम्यान, शमीने (Mohammed Shami) बॉलिंग करता करता मंकडिंग (Mankding) केल्याने सध्या याचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. शमीने तर अपिल केलं. मात्र, त्याचवेळी कॅप्टन रोहितने हसत हसत अपिल मागे घेतली आणि सर्वांचं मन जिंकलं. त्यामुळे रोहितच्या खिलाडूवित्तीचं कौतूक होताना दिसत आहे. त्यानंतर शनाकाने शतक देखील ठोकलं. रोहितने मोठं मन केल्याने शनाकाने शतक पूर्ण केलंय.
सामन्यादरम्यान, नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या फलंदाजाने चेंडू गोलंदाजाच्या हातातून जाण्यापूर्वी त्याच्या क्रीजमधून बाहेर पडल्यास, गोलंदाज त्याला धावबाद करू शकतो. 13 डिसेंबर 1947 रोजी विनू मांकड यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाज बिल ब्राऊनला अशा प्रकारे बाद केलं होतं. रन आऊटची ही पद्धत अनौपचारिकपणे मार्कंडिंग म्हणून ओळखली जाते. क्रिकेटच्या इतिहासात अशाप्रकारे 9 वेळा बाद होण्याचा प्रकार नोंदवला गेला आहे.