KL Rahul च्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा, विराट बाउंड्रीपर्यंत येऊन परत गेला, नेमकं काय घडलं?

IND VS AUS 2nd Test : दुसऱ्या सामन्याचा टॉस भारताचा कर्णधार रोहित शर्माने जिंकला आणि त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान सामन्याच्या सुरुवातीलाच केएल राहुलच्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा झाला. 

पुजा पवार | Updated: Dec 6, 2024, 12:47 PM IST
KL Rahul च्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा, विराट बाउंड्रीपर्यंत येऊन परत गेला, नेमकं काय घडलं?   title=
(Photo Credit : Social Media)

IND VS AUS 2nd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) सुरु असून या सीरिजमधील दुसऱ्या सामन्याला शुक्रवार पासून एडिलेड येथे सुरुवात झाली आहे. पर्थ मधील पहिला सामना जिंकून टीम इंडियाने (Team India) सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्याचा टॉस भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) जिंकला आणि त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान सामन्याच्या सुरुवातीलाच केएल राहुलच्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा झाला. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये 3 महत्वाचे बदल केले. रोहितने देवदत्त पड्डीकल, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेलला बेंचवर बसवलं तर आर अश्विन, शुभमन गिल आणि स्वतः रोहित इत्यादींचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला. रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात स्वतः मिडल ऑर्डरमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आणि टॉप ऑर्डरमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. त्यामुळे पहिल्या टेस्ट प्रमाणे यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल हे दोघे ओपनिंगसाठी मैदानात आले. 

हेही वाचा : IND VS AUS डे अँड नाईट टेस्ट मॅच किती वाजता सुरु होणार? कुठे पाहता येणार Live?

केएल राहुलच्या विकेटवरून ड्रामा: 

सामन्याच्या पहिल्या ओव्हरला मिचेल स्टार्कने यशस्वी जयस्वालची विकेट घेतली. त्यामुळे सामन्याच्या सुरुवातीलाच टीम इंडियाला मोठा धक्का बसला. त्यानंतर 8 व्या ओव्हरला स्कॉट बोलैंडने पहिलाच बॉल केएल राहुलला टाकला. केएल राहुलने तो खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॉल बॅटला लागून विकेटकिपर एलेक्स कॅरीने पकडला. केएल राहुलला कॅच आउट केल्याने ऑस्ट्रेलियन संघ मैदानात जल्लोष करू लागला. आपण आउट झालोय म्हणून राहुल सुद्धा मैदानाच्या बाहेर जायला निघाला. तर विकेट पडल्यामुळे विराट कोहली डगआउटमधून निघून बाउंड्री पर्यंत आला होता. पण विराट मैदानात एंट्री घेणार तेवढ्यात अंपायरने नो बॉलचा इशारा केला आणि केएल राहुलला जीवदान मिळाले.  ऑस्ट्रेलियन संघाचा उत्साह सुद्धा नाराजीचा बदलला आणि विराट पुन्हा  डगआउटमध्ये जाऊन बसला. केएल राहुलला या सामान्यात एकदाच नाही तर दोन वेळा जीवदान मिळाले. अखेर राहुलने 64 बॉलमध्ये 37 धावा करून माघारी परतला. 19 व्या ओव्हरला मिचेल स्टार्कने त्याची विकेट घेतली. 

 

भारताची प्लेईंग 11 :

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), नितीश रेड्डी, रविचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलियाची प्लेईंग 11 :

उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड