औषधीय गुणांची खाण आहे पिंपळाचं झाड, जाणून घ्या फायदे आणि कसा करावा वापर?

Benefits of peempal tree (fig tree): पिंपळाच्या पानांचं फक्त धार्मिक महत्त्वच नाही तर ही बहुउपयोगी वनस्पती आहे. आयुर्वेदानुसार पिंपळाचा वापर औषधी वनस्पती बनवण्यासाठी केला जातो. पिंपळाच्या झाडाला 'दिव्य वृक्ष' सुद्धा म्हणतात. याच्या पानांचा उपयोग करून आपण बरेचसे आजार दूर करू शकतो.

Updated: Dec 27, 2024, 05:26 PM IST
औषधीय गुणांची खाण आहे पिंपळाचं झाड, जाणून घ्या फायदे आणि कसा करावा वापर? title=
(photo-credited to social media)
Benefits of peempal tree (fig tree): पिंपळाच्या झाडाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. अनेकदा पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. शनिवारी लोक पिंपळाच्या झाडाखाली दिवे लावतात. पिंपळाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या, योगासने आणि ध्यान केल्याने शांती आणि ज्ञान मिळते असे म्हणतात. पिंपळाच्या पानांचा आणि सालाचा वापर वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधी बनवण्यासाठी केला जातो. पीपळ वृक्ष हे पृथ्वीवर आढळणाऱ्या सर्व झाडांपैकी ऑक्सिजन शुद्ध करण्यासाठी एक सर्वात महत्वाचं वृक्ष आहे. पिंपळाचं झाड आपल्याला 24 तास ऑक्सिजन देते तर इतर झाडे रात्री कार्बन डायऑक्साइड किंवा नायट्रेट्स सोडतात. अनेक रोगांवर पिंपळ हा रामबाण उपाय ठरत असून, त्याची पाने खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. पिंपळ हे एक आरोग्यवर्धक वृक्ष आहे, असे म्हणता येईल.
 

निरोगी राहण्यास मदत करते

 
पिंपळाच्या पानांमध्ये भरपूर फायबर असते. हे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. याचे सेवन केल्याने आतड्यांसंबंधी क्रिया वाढते आणि बद्धकोष्ठता दूर होते. पिंपळाच्या पानांचे सेवन केल्याने आतडे स्वच्छ होण्यास मदत होते आणि त्याचे अँटी-इंफ्लेमेटरी (anti-inflammatory) गुणधर्म आतड्यांमधील कोणत्याही प्रकारची जळजळ रोखण्यास मदत करतात. पिंपळाची पाने खाल्याने डायरिया सारख्या समस्यांना दूर करता येते. पिंपळाच्या पानांचे सेवन केल्याने आतड्यातील आणि पोटातील विषारी पदार्थ (toxins) बाहेर टाकण्यास उपयोगी ठरते. हे टॉक्सिन बाहेर काढल्याने रक्त शुद्ध करण्यात मदत होते. पिंपळाच्या पानांचे सेवन केल्याने पोटला संसर्ग होण्यापासून वाचवते. अशा संसर्गजन्य रोगापासून सुरक्षेसाठी पिंपळ हा नैसर्गिक उपाय आहे. जर खूप जास्त थकवा किंवा अशक्ती जाणवत असेल तर यावरही पिंपळाच्या पानांचा चूर्ण उपयुक्त ठरतो.
 

कसा करावा वापर

 
1. पिंपळ पानांना वाळत घाला. वाळल्यावर त्याचे पावडर तयार करून दुधात उकळा. हा उकाळा शरीरासाठी फायदेशीर ठरतो.
2. पिंपळाच्या पानांची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये गुळ घालून हे मिश्रण दिवसातून 4-5 वेळा खाल्याने पोटाच्या आजारांवर उपयुक्त ठरतो.
3. पिंपळाची पाने 5 मिनिटे दुधात बुडवून ठेवा, त्यानंतर डोळ्यांवर ठेवल्याने डोळेदुखी थांबवण्यास मदत होते.
4. पिंपळाच्या पानांची पावडर तयार करून त्यात पिठी साखर घालून खाल्याने अपचन आणि बद्धकोष्ठता दूर होते.
5. पिंपळाच्या पानांचा रस करून प्या.
6. पिंपळ वृक्षाच्या सालांनी दात घासल्याने दात मजबूत होतात.
7. पिंपळाच्या झाडाखाली रोज व्यायाम केल्यानेही विविध आजारांवर मात करता येते.