भारतीय मॉडेलने लावलं विश्वविजेत्या ट्रेव्हिस हेडच्या नावाचं कुंकू, गुपचूप लग्नही केलं... व्हिडिओ व्हायरल

भारतात खेळवण्यात आलेल्या आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या विजयचा हिरो ठरला तो शतकी खेळी करणारा ट्रेव्हिस हेड.

Updated: Nov 21, 2023, 07:34 PM IST
भारतीय मॉडेलने लावलं विश्वविजेत्या ट्रेव्हिस हेडच्या नावाचं कुंकू, गुपचूप लग्नही केलं... व्हिडिओ व्हायरल title=

Travis Head and Bengali Model: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धा संपून आता दोन दिवस उलटलेत. पण अंतिम सामन्यातील पराभव भारतीय चाहते अद्यापही विसरलेले नाहीत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) सलग दहा विजय मिळत फायनलमध्ये धडक मारली. पण ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताचं तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याचं स्वप्न भंगलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) रंगलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा खरा हिरो ठरला तो सलामीवीर ट्रेव्हिस हेड (Travis Head).

टीम इंडियाने पहिली फलंदाजी करत 241 धावा केल्या. याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाची सुरुवातही खराब झाली. पहिले तीन विकेट झटपट गेल्या. पण एका बाजूला ट्रेव्हिस हेड भक्कमपणे उभा राहिला, केवळ उभाच राहिला नाही तर त्याने भारतीय गोलंदाजांचा सक्षमपणे सामनाही केला. 120 चेंडूत हेडने 137 धावांची मॅचविनिंग खेळी केली. हेडला प्लेअर ऑफ द मॅच घोषित करण्यात आलं. या खेळीने ट्रेव्हिसि हेडचं कौतुक होत असतानाच आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बंगाली मॉडेल हेमोश्री भद्राने (Hemoshree Bhadra) ट्रेव्हिस हेडसोबत लग्ना केल्याचं समोर आलं आहे. 

बंगाली मॉडलने हेडसोबत केलं लग्न
हेमोश्री भद्राने लग्नाचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. वास्तविक हे  लग्न खरं नाहीए. हेमोश्रीने हेडच्या फोटोसोबत लग्न केलंय. शेअर केलेल्या व्हिडिओत हेमोश्रीने पारंपारिक शंख वाजवत हेडच्या फोटोसोबत लग्न केलं. त्याच्या नावाच कुंकू आपल्या भांगेत भरलं. याचा व्हिडिओ हेमोश्रीने शेअर केला असून या व्हिडिओत हेमोश्रीच्या कुटुंबातील काही लोकं दिसतायत.

'ट्रेविस हेड के नाम का अपने मांग में सिंदूर डाली है. जितना सोचती हूं इस लड़के के बारे में उतनी बढ़ती है मेरे चेहरे की लाली. अपने ब्यूटीफुल हाथों से पिक्चर है थामी. काश ये बन जाए मोरा स्वामी' अशी कविताही हेमोश्रीने या व्हिडिओत केली आहे. बंगाली पारंपारिक लग्नाच्यावेळी जी म्यूझिक वाजवली जाते, ती वाजताना या व्हिडिओत दिसतेय.

हेमोश्रीने व्हिडिओ शेअर करत एक कॅप्शनही लिहिलंय, यात तीने म्हटलंय मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, तुझ्या टॅलेंटने माझं ह्रदय जिंकलं आहे. टेव्हिस हेड लव यू, असं यात तीने लिहिलं आहे. पण हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हेमोश्री अडचणीत सापडली आहे. सोशल मीडियावर तिला जोरदार ट्रोल करण्यात येत आहे.