वर्ल्ड कप हारल्यानंतर विराट कोहलीने उचललं मोठं पाऊल, घेतला महत्वाचा निर्णय

Virat Kohli: वर्ल्ड कप संपताच विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. काय आहे हा निर्णय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 21, 2023, 06:35 PM IST
वर्ल्ड कप हारल्यानंतर विराट कोहलीने उचललं मोठं  पाऊल, घेतला महत्वाचा निर्णय  title=

Virat Kohli: वर्ल्ड कप 2023 टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव झाला. संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाने एकही सामना गमावला नव्हता पण अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून 6 गडी राखून पराभव पत्करावा लागला. यासह टीम इंडियाचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा अधुरे राहिले. आता टूर्नामेंट संपल्यानंतर टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. वर्ल्ड कप संपताच विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. काय आहे हा निर्णय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

वर्ल्ड कप 2023 मध्ये विराट कोहलीने चांगली कामगिरी केली. सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड आपल्या नावे केला. दरम्यान आता कोहलीने त्याचे मॅनेजर बंटी सजदेहसोबतचे अनेक वर्षांचे नाते तोडले आहे. यामागचे नेमके कारणे अद्याप समोर आलेले नाही. बंटी सजदेह हा रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहचा चुलत भाऊ आहे. बंटी सजदेह कॉर्नरस्टोन पीआर नावाच्या कंपनीचा मालक आहे. विराट कोहली किंवा बंटी सजदेहकडून यावर कोणतेही भाष्य करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यानंतर या घटनेवर स्पष्टता येणार आहे. 

विराट कोहली आणि बंटी सजदेह यांनाही जवळचे मित्र मानले जाते. कोहलीने याआधी सोशल मीडियाच्या माध्यमातून बंटीसाठी अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. बंटी सजदेहच्या पीआर कंपनीकडे विराट कोहलीसोबतकेएल राहुल, अजिंक्य रहाणे, शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्या पीआरची कामे आहेत.

कोहलीची स्वत:ची कंपनी?

कोहली आणि बंटी अनेक वर्षांपासून एकत्र आहेत. दोघांनी प्युमा या ब्रँड कंपनीसोबत 100 कोटी रुपयांचा करारही केला होता, मात्र आता बंटी आणि कोहली यांच्यातील नाते संपुष्टात आल्याचे वृत्त समोर येत आहे.
विराट कोहली स्वतःची कंपनी सुरु करणार असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. त्याची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.

कोहलीच्या धावांचा डोंगर 

टीम इंडियाला वर्ल्ड कप मिळविण्यात यश आले नसले तरी विराट कोहलीने या संपूर्ण स्पर्धेत आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्याने आपल्या बॅटने 90 पेक्षा जास्त सरासरीने 765 धावा केल्या. वर्ल्ड कपमध्ये त्याने 3 शतके आणि 6 अर्धशतके झळकावली. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने वनडेतील 50 वे शतक झळकावले. त्याने सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक 49 एकदिवसीय शतकांचा विश्वविक्रम मोडला आणि एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज बनला. विराट कोहलीने या विश्वचषकात अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. एकाच विश्वचषकाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज ठरला.