हनुमान भक्त , बॅटवर 'ॐ', पाकिस्तानचा पराभव करणारा केशव महाराज कोण?

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त चुरशीच्या झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर एक विकेटने मात केली. दक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या जोडीने चिकाटाने फलंदाजी करत पाकिस्तानला धुळ चारली

राजीव कासले | Updated: Oct 28, 2023, 04:36 PM IST
हनुमान भक्त , बॅटवर 'ॐ', पाकिस्तानचा पराभव करणारा केशव महाराज कोण? title=

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या 26 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा (South Africa beat Pakistan) 16 चेंडू आणि 1 विकेट राहखून पराभव केला. पाकिस्तानने पहिली फलंदाजी करताना 270 धावा केल्या. विजयाचं हे आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने नऊ विकेट गमावले. पण शेवटच्या जोडीने चिकाटीने फलंदाजी करत संघाला शानदार विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेच्या अॅडन मारक्रमने तीन षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने 93 चेंडूत 91 धावा केल्या. पण दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा खरा हिरो ठरला तो नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला केशव महाराज. 

पाकिस्तान-द.आफ्रिका चुरशीचा सामना
दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 11 धावांची गरज असताना पाकिस्तानच्य हारिस रौफने स्वत:च्या गोलंदाजीवर एनडिगीचा झेल टिपत सामन्यावर मजूबत पकड मिळवली. पाकिस्तान विजयाच्या उंबरठ्यावर असतानाच दक्षिण आफ्रिकेची शेवटची जोडी केशव महाराज (Keshav Maharaj) आणि तबरेज शम्सी मैदानात उतरली. दोघांनी अतिशय चिकाटीने फलंदाजी केली. केशव महाराजने मोहम्मद नवाझच्या गोलंदाजीवर चौकार मारत पाकिस्तानच्या विजयाचं स्वप्न उधळून लावलं. 

या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. विशेष म्हणज गेल्या 24 वर्षात दक्षिण आफ्रिकेचा संघ विश्वचषकाच्या कोणत्याच फॉर्मेटमध्ये पाकिस्तानला हरवू शकला नव्हता. 2015 आणि 2019 च्या विश्वचषकात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. 

केशव महाराज सोशल मीडियावर ट्रेंड
दक्षिण आफ्रिकेच्या शानदार विजयानंतर सोशल मीडियावर केशव महाराज ट्रेंडमध्ये आहे. केशव महाराजचं पूर्ण नाव केशव आत्मानंद महाराज. तो डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज आहे. 2016 मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेट खेळणाऱ्या केशवने 2018 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात 9 विकेट घेतल्या. 

सोशल मीडियावर केशवच्या जातीचा शोध
पाकिस्तानवरच्या विजयानंतर केशव महाराजचा एक पोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. केशव महाराजच्या बॅटवर ओम लिहिलं आहे, यानंतर तो हिंदू आहे की इतक कोणत्या जातीचा याचा शोध घेतला जातोय. बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याने केशव महाराजाचं कुटुंब उत्तरप्रदेशच्या सुल्तानपूरमधून असल्याचं म्हटलंय. तीन आठवड्यांपूर्वी केशव महाराजने केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात दर्शन घेतलं. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

केशव महाराज हनुमान भक्त असल्याचंही सांगितलं जातं. सोशल मीडिया प्रोफाईवर त्याने 'जय श्री राम आणि जय श्री हनुमान' लिहिलं आहे. काही पोस्टमध्ये संस्कृत श्लोकसह 'जय श्री हनुमान' लिहिलं आहे. सोशल मीडियावर आपण आस्तिक असल्याचंही त्याने लिहिलं होतं. 2016 मध्ये त्याने सोशल मीडियावर श्री रामाचा फोटो शेअर करत 'जो राम नाम नहीं गाते, वो जीते जी मर जाते हैं. जो राम नाम गाते हैं, वो परम धाम पाते हैं.' असं लिहिलं होतं. दक्षिण आफ्रिकेत राहुनही केशव महाराज हिंदू धर्माचं पालन करत असल्याचं लोकं म्हणतायत. 

पाकिस्तानवरच्या विजयानंतर केशव आणि त्याच्या ओम लिहिलेल्या बॅटचे फोटो सोशल मीडियाव व्हायरल होत असून एका युजरने केशवच्या बॅटवर ओम लिहिल्याने पाकिस्तानचे खेळाडू त्याला आऊट करु शकले नाहीत असं म्हटलंय. तर एका युजरने हिंदू केशव महाराजने पाकिस्तानच्या इस्लामिक संघाला हरवलं असं म्हटंलय. एका युजरने थेट डीएमके आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनवर टीका करत आज एक हिंदू, केशव महाराजने पाकिस्तानचा पराभव केला, एमके स्टॅलिन आणि त्यांचा मुलगा निराश झाले असतील असं म्हटलंय.