इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या कमबॅक करणार, टीममधून बाहेर कोण बसणार?

ICC World Cup India vs England : आयसीसी विश्वचषकात टीम इंडियाचा पुढचा म्हणजे सहावा सामना इंग्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या टीम इंडिया कमबॅक करणार की नाही याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 23, 2023, 08:44 PM IST
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या कमबॅक करणार, टीममधून बाहेर कोण बसणार? title=

Hardik Pandya: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत यजमान टीम इंडियाने (Team India) सलग पाच सामने जिंकले असून आता सहाव्या सामन्यासाठी संघ सज्ज झाला आहे. भारताचा पुढचा सामना येत्या रविवारी म्हणजे 29 ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्ध (India vs England) रंगणार आहे. लखनऊच्या एकाना स्टेडिअमवर हा सामना रंगणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया कसून सराव करतेय. 

हार्दिक पांड्याचा फिटनेस
दरम्यान, टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) फिटनेसबाबत मोठी माहिती समोर आली आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या पायाला दुखापत झाली होती. यानंतर त्याच्या पायावर उपचार सुरु आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धचा सामना तो खेळू शकला नाही. आता सहावा सामना खेळण्यासाठी टीम इंडियाकडे आठवडाभराचा पुरेसा वेळ आहे. यादरम्यान हार्दिक पांड्या पूर्णपणे फिट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  29 तारखेला होणारा इंग्लंडविरुद्धच्या सामना हार्दिक खेळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बीसीसीायच्या सूत्रांनी दिलेल्य माहितीनुसार हार्दिक पांड्याच्या रिप्लेसमेंटमचा कोणताही प्लान नाहीए. हार्दिक पांड्याच्या पायाची दुखापत फारशी गंभीर नाहीए. 

त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या टीम इंडियात उपलब्ध होईल. हार्दिक पांड्याच्या पायावर बंगुळुरुच्या राष्ट्रीय अकादमीत उपचार सुरु आहेत. बांगलादेशविरुद्ध 19 ऑक्टोबरला खेळवण्यात आलेल्या सामन्यात स्वत:च्याच गोलंदाजीवर फलंदाजाने मारलेला फटका अडवताना हार्दिकच्या पायाला दुखापत झाली. यानंतर त्याला तात्काळ मैदानाबाहेर नेण्यात आलं. हार्दिक पांड्याचं अपूर्ण षटक विराट कोहलीने पूर्ण केलं. 

कोणाला संधी मिळणार?
हार्दिक पांड्या संघाचा अष्टपैलू खेळडू आहे. तिसरा वेगवान गोलंदाज आणि सहाव्या क्रमांकाला फलंदाजीसाठी हार्दिक उपयुक्त ठरतोय. अशा परिस्थितीत तो फिट असल्यास त्याला संघाबाहेर बसवण्याची चूक टीम इंडिया करणार आहे. अशा परिस्थितीत इंग्लंडविरुद्ध हार्दिक पांड्याने टीम इंडियात कमबॅक केल्यास सूर्यकुमार यादवला बाहेर बसावं लागले. हार्दिकच्या गैरहजेरीत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवला संधी मिळाली होती. पण त्याला आपला फॉर्म दाखवताच आला नाही. दोन धावांवर असतानाच सूर्यकुमार दुर्देविरित्या बाद झाला. 

शमीला बाहेर बसावं लागणार?
दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या समावेशामुळे तिसऱ्या वेगवान गोलंदाजीची गरजही पूर्ण होणार आहे. त्यातच लखनऊची खेळपट्टीही फिरकीला साथ देणारी आहे. त्यामुळे संघात दोन फिरकी गोलंदाज आणि तीन वेगवान गोलंदाज असं कॉम्बिनेशन असू शकतं. असं झालं तर न्यूझीलंडविरुद्ध पाच विकेट घेणाऱ्या मोहम्मद शमीला बाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे संघाचे प्रमुख गोलंदाज असून सुरुवातीच्या षटकात विरोधी संघावर दबाव टाकण्यात दोघंही यशस्वी ठरतायत.