विश्वविजेत्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ऑस्ट्रेलियात अशी वागणूक, Video पाहून धक्का बसेल

ICC World Cup 2023 : आयससी विश्वचषक स्पर्धा 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा सहा विकेट राखून पराभव केला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने ही दमदार कामगिरी केली. या स्पर्धेनंतर पॅट कमिन्स मायदेशी परतला. पण तिथे त्याला मिळालेली वागणूक पाहून धक्का बसेल. 

राजीव कासले | Updated: Nov 22, 2023, 02:34 PM IST
विश्वविजेत्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ऑस्ट्रेलियात अशी वागणूक, Video पाहून धक्का बसेल title=

ICC World Cup 2023 Pat Cummins : विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा (Australia World Chamdpion) पराभव केला आण सहाव्यांदा क्रिकेट विश्वचषकाव नाव कोरलं. पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दमदार कामगिरी करत विश्वचषक विजयाला गवसणी घातली. विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका (T20 Series) खेळवली जाणार आहे. पण या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियातील काही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यात कर्णधार पॅट कमिन्सचाही समावेश आहे. संघाला विश्ववेजता बनवणारा कर्णधार पॅट कमिन्स मायदेशी रवाना झालाय. पण यावेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो व्हिडिओ पाहून क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. 

विमानतळावरचा व्हिडिओ व्हायरल
पॅट कमिंस हे नाव सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चर्चेत आहे.  वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने (Australia) जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यजमान भारताचा पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर उपस्थित असलेल्या जवळपास दीड लाख प्रेक्षकांच्या उपस्थितीत ऑस्ट्रेलियाने टीम इंजियाचा सहा विकेटने पराभव केला. पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये जिंकण्याची जिद्द निर्माण केली. विश्वचषक विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आपल्या मायदेशी म्हणजे ऑस्ट्रेलियात परतला आहे. पण ऑस्ट्रेलियात त्याला मिळालेली वागणूक पाहून क्रिकेट चाहते हैराण झाले आहेत. 

पॅट कमिन्सला अशी वागणूक
विश्वचषक जिंकल्यानंतर पॅट कमिन्स मंगळवारी ऑस्ट्रेलियात दाखल झाला. पण ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याचं स्वागत करण्यासटी कोणची नव्हतं. ना क्रिकेट चाहते होते, ना ढोल-ताशांचा गजर होता. दोनचार लोकं आणि मीडियाचे काही पत्रकार उपस्थित होते. यातही कोणता जल्लोष नव्हता. विश्वचषक विजेत्या खेळाडूचं स्वागत असं स्वागत पाहून क्रिकेट जगत हैराण झालंय. याच जागी जर भारताने विश्वचषक जिंकला असता आणि टीम इंडियाचे खेळाडू विमानतळावर आले असते तर तिथला नजरा काही वेगळाच असता. हजारो क्रिकेट चाहत्यांची गर्दी असती, ढोल-ताशांच्या गजरात स्वागत झालं असतं. फटाक्यांची आतषबाजी झाली असती. इतकंच काय तर ओपन बसमधून मिरवणूक काढण्यात आली असती. पण असा कोणताही जल्लोष ऑस्ट्रेलियात दिसला नाही.

एका वर्षात दोन आयसीसी ट्रॉफी
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने एकाच वर्षात आयसीसीच्या दोन ट्रॉफी जिंकण्याची किमया साधली आहे. एकदिवसीय विश्वचषकाआधी याच वर्षी ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पयनशीचं जेतेपदही पटकावलं आहे. त्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला होता. 

पॅट कमिन्सची कामगिरी
आयसीसी विश्वचषक स्पर्धेत पॅट कमिन्सने दमदार कामगिरी केलीय. कमिन्सने 11 सामन्यात 15 विकेट घेतल्या. याशिवाय 128 धावाही केल्यात. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलला कमिन्सने दिलेली साथ क्रिकेटच्या इतिहासात कायम स्मरणात राहिल.