IND vs BAN: विश्वचषकात विक्रम रचण्यापासून काही पावलं दूर, जसप्रीत बुमराह करणार ऐतिहासिक कामगिरी

World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत तीन सामने जिंकून भारताने मिशन वर्ल्ड कपची दणक्यात सुरुवात केली आहे. आता सलग चौथा विजय मिळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. यादरम्यान टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ऐतिहासिक कामगिरीपासून काही पवालं दूर आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 19, 2023, 02:10 PM IST
IND vs BAN: विश्वचषकात विक्रम रचण्यापासून काही पावलं दूर, जसप्रीत बुमराह करणार ऐतिहासिक कामगिरी title=

Jasprit Bumrah: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. सलग तीन सामने जिंकत टीम इंडियाने विजयाची हॅटट्रीक केली आहे. टीम इंडियाचे खेळाडू जबरदस्त फॉर्मात आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर हे प्रमुख फलंदाज मॅचविनिंग कामगिरी करतायत. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा हे गोलंदाजही मागे नाहीत. यातही जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) विश्नचषक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करण्यापासून काही पावलंच दूर आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमरहा तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

बुमराह जबरदस्त फॉर्मात
दुखापतीतून सावरत बऱ्याच कालावधीनंतर जसप्रीत बुमराहने टीम इंडियात पुनरागम केलं. आता विश्वचषकात बुमराह जबरदस्त फॉर्मात आहे. तीन सामन्यात त्याने 8 विकेट घेतल्या आहेत. बुमराहची नजर आता भारताचे महान गोलंदाज कपिल देव यांच्या विक्रमावर आहे. पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात बुमराहने सात षटकात अवघ्या अवघ्या 19 धावा देत दोन विकेट घेतल्या, त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.  तर त्याआधीच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सान्यात त्याने चार विकेट घेतल्या होत्या. यासाठी त्याने दहा षटकात केवळ 39 धावा दिल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात बुमराहने 10 षटकात केवळ 35 धावा देत दोन विकेट घेतल्या होत्या.

जसप्रीत बुमराह विश्वचषक इतिहासात आतापर्यंत 12 सामने खेळला असून यात त्याने 26 विकेट घेतल्या आहेत. कपिल देव यांचा विक्रम मोडण्यासाठी बुमराहला आता केवळ तीन विकेटची गरज आहे. विश्वचषक इतिहासात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदांजांमध्ये बुमराह सहाव्या क्रमांकावर आहे. बुमराहच्या पुढे म्हणजे पाचव्या क्रमांकावर कपिल देव असून त्यांनी 1979-1992 दरम्यान विश्वचषकात 28 विकेट घेतल्या आहेत. कपिल देव यांचा विक्रम मोडण्यासाठी बुमराहला केवळ तीन विकेटची गरज आहे. 

बुमराहने पाच विकेट घेतल्यास पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी आणि शोएब अख्तरचा तीस विकेटचा विक्रम तो मागे टाकेल. तर अनिल कुंबळेच्या 31 विकेटच्या विक्रमाशी बुमराह बरोबर करेल. 

विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज
झहीर खान - 44 
जवागल श्रीनाथ - 44 
मोहम्मद शमी - 31 
अनिल कुंबले - 31 
कपिल देव - 28 
जसप्रीत बुमराह - 26