IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया हार्दिक पांड्याशिवाय खेळणार, अशी आहे Playing XI

World Cup 2023 India vs New Zealand: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सामना रंगणार आहे. दोनही संघांनी या प्रत्येकी चार सामने जिंकले असून सलग पाचवा सामना कोणता संघ जिंकणार याकडे क्रिकेटप्रेंमींचं लक्ष लागलं आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 21, 2023, 12:55 PM IST
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया हार्दिक पांड्याशिवाय खेळणार, अशी आहे Playing XI title=

Team India Probable Playing 11: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडचा (India vs New Zealand) संघाने सलग चार सामने जिंकले आहेत. पॉईंटटेबलमध्ये (WC PointTable) न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानावर आहे. भारतीय क्रिकेट संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. 22 ऑक्टोबरला हे दोनही संघ आमने सामने येणार आहेत. त्यामुळे सलग पाचवा सामना कोण जिंकणार याकडे क्रिकेटचाहत्यांना लक्ष लागलं आहे. पॉईंटटेबलमध्ये अव्वल स्थान गाठायचं असेल तर रोहितसेनेला हा सामना जिंकावाच लागणार आहे. शिवाय या विजयाबरोबर सेमीफानयलमधलं (WC Semifinal) स्थानही जवळपास निश्चित होणार आहे. 

विश्वचषक स्पर्धेचा इतिहास पाहिला तर टीम इंडियाची न्यूझीलंडविरुद्धची कामगिरी फारशी समाधानकारक नाही. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान आतापर्यंत 9 सामने खेळवण्या आले आहेत. यातल्या पाच सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारली आहे. तर केवळ तीन सामने भारताला जिंकता आलेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. विश्वचषक स्पर्धेत दोनही संघ 2019 मध्ये आमने सामने आले होते. यात न्यूझीलंडने बाजी मारली होती.

हार्दिक पांड्या खेळणार नाही
न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या या सामन्यात खेळणार नाहीए. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या पायाचा स्कॅन करण्यात आाला असून हार्दिक काही दिवसांची विश्रांती सांगण्यात आली आहे. हार्दिक पांड्या वैद्यकीय उपचारासाठी बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अकदमीत जाणार आहे तिथून तो थेट लखनऊला पोहोचेल. 29 ऑक्टोबरला भारत आणि इंग्लंडदरम्यान लखनऊमध्ये सामना खेळवला जाणार आहे. 

प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी
हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत भारतीय संघात कोणाला संधी मिळणार याची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी हे दोन पर्याय टीम इंडियासमोर आहेत. गेल्या चार सामन्यात भारतीय फलंदाजी मजूबत दिसलीय. त्यामुळे गोलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलं जात आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीला संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे. शमी चांगला फॉर्मात असला तरी पहिल्या चार सामन्यात त्याला संधी देण्यात आलेली नाही.

शार्दुल ठाकूर बाहेर होणार?
हार्दिक पांड्याच्या जागी ऑलराऊंडर शार्दुल ठाकूरचाही पर्याय संघासमोर आहे. पण गेल्या तीन सामन्यात संधी मिळूनही शार्दुल ठाकूरला काही खास कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे दिग्गज क्रिकेटर्सकडून त्याच्या निवडीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. 

या स्पर्धेत शार्दुल ठाकूरची कामगिरी
अफगाणिस्तान विरुद्ध : 6-0-31-1
पाकिस्तान विरुद्ध : 2-0-12-0
बांग्लादेश विरुद्ध : 9-0-59- 1 

न्यूझीलंडविरुद्ध भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रव‍िचंद्रन अश्व‍िन, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

भारताच पंधरा खेळाडूंचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विन.