माऊंट मौनगनुई : अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारताच्या संघाने झिम्बाब्वेवर सहज विजय मिळवलाय. भारताने झिम्बाब्वेला १० विकेट राखून पराभूत केले.
झिम्बाब्वेने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४८.१ षटकांत १५४ धावा केल्या. भारताने हे आव्हान सहज पूर्ण केले. सलामीवीर एच एम देसाईच्या ५६ धावा आणि शुभम गिलच्या ९० धावांच्या जोरावर भारताने एकही विकेट न गमावता हे आव्हान पूर्ण केले.
शुभमने ५९ चेंडूत १४ चौकार आणि एक षटकारासह ९० धावा ठोकल्या. तर देसाईने ७३ चेंडूत ५६ धावा केल्या. यात ८ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. भारताने अवघ्या २१.४ षटकांत १५५ धावा केल्या.
#INDvAUS: 100 run win #INDvPNG: 10 wicket win #INDvZIM: 10 wicket win
Three from three for India at #U19CWC! https://t.co/z37wftHcZe
— ICC (@ICC) January 19, 2018
झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयासह आतापर्यंत या स्पर्धेत भारत अपराजित राहिलाय.